लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाने दहशतीत गेलेल्या २०२० च्या अखेरीस डिसेंबर महिन्यात ३० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूसंख्या १३५३ वर पोहोचली. एकत्रीत डिसेंबर महिन्याची आकडेवारी प्रशासनाने प्रथमच जाहीर केली आहे. या महिन्यात १२९४ नव्या रुग्णांची भर पडली असून १३५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
रुग्ण शंभराखालीच
रुग्णवाढ काही प्रमाणात समोर येत असली तरी सद्यस्थितीत रुग्णसंख्या ही शंभराच्या खालीच असल्याने एक दिलासादायक वातावरण असल्याचे तसेच ही वाढ अधिक नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डिसेंबरच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये महिन्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. तर शेवटच्या पाच दिवसांमध्ये दहा मृत्यू नोंदविण्यात आले आहे.
अधिक रुग्ण यादिवशी
४ डिसेंबर : ५५
११ डिसेंबर : ५६
२२ डिसेंबर : ५७
२४ डिसेंबर : ७१
३० डिसेंबर : ८०
३१ डिसेंबर : ६०
नवे २९ रुग्ण
जिल्ह्यात शनिवारी १७०० अहवाल आले त्यात २९ बाधित रुग्ण आढळून आले. ४४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकाही मृत्यूची नोंद नसल्याचे दिलासा मिळाला आहे. शहरात ९ नवे रुग्ण समोर आले आहेत. कोरोनामुक्तीकडे जाणाऱ्या यावल तालुक्यात पुन्हा कोरोना सक्रीय झाला असून दोन दिवसांपासून रुग्ण समोर येत असल्याने सक्रीय रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. अशा अनेक तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण समोर येत आहे.