अमळनेर, जि.जळगाव : भिल्ल समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला साकडे घालण्यात आले. याबाबतचे निवेदन एकलव्य संघटनेतर्फे तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले.एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष पंडित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ हजर होते.स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही भिल्ल समाजास हेतू पुरस्कर मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.आदिवासी भिल्ल समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देणे, राजस्व अभियान अंतर्गत जातीचे दाखले व रेशन कार्ड घरपोच मिळावे, गायरान, वनजमिनी नावे करून सातबारा उतारे मिळावे, भिल्ल समाजाच्या विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्ती मिळावे असे निवेदनात नमूद केले आहे.निवेदनावर संघटनेचे सचिव आबा बहिरम, तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष फकिरा काळू पवार, सदस्य गुरू सोनवणे, संघटक लक्ष्मण मोरे, अधिकार भिल, आकाश सोनवणे, सुखराम भिल, चिंधा लखीचंद भिल, भैयासाहेब सोनवणे, बाळू लोखंडे, धोंडू पवार, संदीप सोनवणे, अविनाश नगराळे, नंदू सोनवने, गणेश सोनवणे, राजू भिल, मनोहर भिल, सुनील भिल, रवींद्र मोरे, गोविंदा भिल, बाळू भिल, विश्वास सोनवणे, राजू गायकवाड, भावलाल पवार, अनिल पवार आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
अमळनेर येथे भिल्ल समाजाचे प्रशासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 6:19 PM
अमळनेर , जि.जळगाव : भिल्ल समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला साकडे घालण्यात आले. याबाबतचे निवेदन एकलव्य संघटनेतर्फे तहसीलदार प्रदीप पाटील ...
ठळक मुद्देएकलव्य संघटनेने घेतली तहसीलदारांची भेटसुविधा मिळण्याची केली मागणी