जामनेर : कोरोना संसगार्चा धोका लक्षात घेता शासनाच्या विविध नियमांची सांगड घालून या वर्षीचा नवरात्र महोत्सव साजरा होणार शासनाने आखून दिलेल्या मंडळाना नवदुर्गा स्थापनेची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली.आगामी नवदुर्गा महोत्सवाकरिता बैठक घेण्यात आली. त्यात सार्वजनिक नवदुर्गा मंडळाला नवदुर्गा स्थापना करण्यासाठी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक जागा, रस्त्यावर मंडपाची उभारणी करता येणार नाही. सार्वजनिक नवदुर्गा मूर्तीची उंची ४ तर घरगुती मूर्ती दोन फुटांपर्यंत मर्यादित असावी. स्थापना व विसर्जनासाठी केवळ चार व्यक्ती उपस्थित राहतील. विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.दर्शनासाठी येणाºया भाविक व स्वयंसेवकांसाठी हॅण्डवॉश, सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळावे लागणार आहे. सर्व नियम पाळून नवदुर्गा व दसरा महोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केले आहे. यावेळी सर्व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवदुर्गा महोत्सवात नियमांची अंमलबजावणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 3:28 PM
कोरोना संसगार्चा धोका लक्षात घेता शासनाच्या विविध नियमांची सांगड घालून या वर्षीचा नवरात्र महोत्सव साजरा होणार शासनाने आखून दिलेल्या मंडळाना नवदुर्गा स्थापनेची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली.
ठळक मुद्दे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांचे मंडळ पदाधिकाऱ्यांना आवाहनजामनेर येथे नवदुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक