जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सावदा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आकाश रामचंद्र पाटील (वय 38, रा़ रायसोनी नगर, मूळ रा.विवरे, ता.रावेर) यांच्यावर 10 युनिटची अतिरिक्त जबाबदारी होती, आणि याच कामाच्या ताणामुळे शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीतील विविध संघटनांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.कठोर कारवाईची मागणीसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिका:यांवर कठोर कारवाईसाठी संघटनांतर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरू आह़े सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने या आंदोलनाला पाठिंबा दिला आह़े 5 रोजी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होत़े 6 जानेवारीपासून सामूहिक रजा आंदोलन सुरू आह़े या आंदोलनात आकाश पाटील यांचाही सहभाग होता़ वरिष्ठांच्या त्रासामुळे तसेच कामाच्या ताणतणावातून आत्महत्या केलेल्या उपकार्यकारी अभियंत्याच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी असता दुस:या उपकार्यकारी अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो, हा दुर्दैवी योगायोगाच म्हणावा लागेल़महावितरणकडून चार पत्रेमृत्युमुखी पडलेले आकाश पाटील यांचे मोठे भाऊ प्रशांत पाटील यांनी सांगितले की, आकाश हे उपकार्यकारी अभियंता होत़े मात्र सहायक अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने 10 युनिटची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर होती़ महावितरणची थकबाकी वसुलीची मोहीम सुरू आह़े त्यांच्यावर वरिष्ठांचा वसुलीसाठी दबाव होता़ वसुलीसाठी त्यांना महावितरणकडून चार पत्र देण्यात आले होते. अतिरिक्त कामामुळे त्याच्यावरील ताण वाढला़ त्यामुळेच त्यांना एवढय़ा कमी वयात हृदयविकाराचा झटका आला असल्याचेही सबऑर्डिनेट असोसिएशनचे सहसचिव कुंदन भंगाळे यांनी सांगितल़े
अभियंता मृत्यू प्रकरण : 10 युनिटची अतिरिक्त जबाबदारी
By admin | Published: January 08, 2017 12:53 AM