जळगाव : साकरी तलावातील मुरूम बेकायदेशीर रित्या काढल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय महामार्गाशी संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला़ लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता आऱ के़ नाईक यांनी हे गुन्हे दाखल करावे अन्यथा आम्ही करू, असा पवित्रा सदस्यांनी घेतला होता़जलव्यवस्थापन समितीची सभा अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली़ यावेळी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सदस्या पल्लवी सावकारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते़ साकरी तलावातील २९ लाख रूपयांचा मुरूम बेकायदेशीररित्या काढण्यात आला असून यासंदर्भात काय कारवाई केली असा प्रश्न सदस्या पल्लवी सावकारे यांनी उपस्थित केला़ या प्रश्नांवरून अभियंता नाईक यांना सदस्यांनी धारेवर धरले. दरम्यान, एका उपअभियंत्यांनी चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल केल्याचा मुद्दा मांडत उपाध्यक्ष महाजन यांनी याबाबत जाब विचारला़२१ पाणी योजनांचा पाठपुरावा करावेळेत कार्यारंभ आदेश न दिल्याने २१ पाणीपुरवठा योजनांची कामे स्थगित करण्यात आली आहेत. याचा निधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परत गेल्याचा मुद्दा मांडत यासंदर्भात तत्काळ पाठपुरावा करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली़
मुरूम उपश्यावरून अभियंते धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 1:07 PM