जळगाव : दिवसेंदिवस झपाट्याने घसरणारी जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकवायची असेल तर आम्ही राजकारणी ज्या प्रमाणे इतर पक्षाचे नेते फोडतो; त्याप्रमाणे तुम्ही इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी फोडा, असा सल्ला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना रविवारी येथे दिला. असे केले तरच जि.प. शाळा टिकतील, असेही त्यांनी नमूद केले.जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे होते. जिल्हा परिषदेच्या शाळांना राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेली ही आग काही दिवसात माध्यमिक शाळांनादेखील लागण्याची शक्यता आहे. ही आग विझवायची असेल तर जि.प.शाळा वाचविण्याचे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.
..तर इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी फोडा - गुलाबराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 4:52 AM