जळगाव : पोलिस अधीक्षक कार्यालय व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाओ, बेटी पढाओ व वन स्टॉप सेंटर अंतर्गत, जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच मंगलम हॉल येथे घेण्यात आली. या कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ठोंबरे, बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष सुवर्णा कुळकर्णी, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष वैजयंती तळेले उपस्थित होत्या. यावेळी २०० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बालहक्क आयोगाचे संचालक संतोष शिंदे उपस्थीत होते. प्रास्ताविक महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले. सुत्रसंचलन योगेश मुक्कावार यांनी केले.
महिला व बालविकास विभागाची कार्यशाळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:16 AM