जळगाव : सर्वसामान्य मालमत्ताधारकांप्रमाणे एमआयडीसीतील उद्योजकांनी महापालिकेचे १७ कोटी ७६ लाख रुपये थकविले आहेत. सामान्य नागरिकांना अभय योजनेचा लाभ देण्यात आला तसाच लाभ उद्योजकांना द्यावा यासाठी ३१ मार्चपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात यावी यासाठी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला साकडे घातले आहे. या योजनेचा लाभ मिळाला तर शंभर टक्के थकबाकी भरण्याची हमी देखील या शिष्टमंडळाने दिली आहे.
उद्योजक व आयुक्तांच्या भेटीनंतर ५ मार्चपर्यंत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ही मुदतवाढ उद्योजकांसाठीच नाही तर सरसकट सर्वांसाठीच लागू असल्याची माहिती उपायुक्त गणेश चाटे यांनी दिली. या योजनेचा लाभ घेतला तर उद्योजकांचा २ कोटी ६२ लाख रुपयांचा फायदा होणार आहे. यासाठी शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशीही भरणा स्विकारला जाणार आहे