जळगाव : वाळू गटांना मंजुरी देण्यासंदर्भात पर्यावरण समितीची १२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यामध्ये जिल्ह्यातील ४० वाळू गटांना समितीने मान्यता दिली.वाळू गटांची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली असून नवीन वाळू गटांच्या निविदा प्रक्रियेची तयारी महसूल विभागाकडून सुरू आहे. त्यात यंदा संबंधीत ग्रा.पं. व भूजल सर्वेक्षण विभागाची ना-हरकत मिळालेल्या ४० नवीन प्रस्तावित वाळू गटांना पर्यावरण समितीची मंजुरी मिळण्यासंदर्भात १२ रोजी पर्यावरण समितीची अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक जाधव यांच्यासह वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह पर्यावरण सल्लागार उपस्थित होते.या बैठकीत ४० वाळू गटांना मंजुरी दिली आहे, मात्र नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेत न्यायालयाने राज्यभरातील वाळू ठेक्यांच्या प्रक्रियेसाठी जाहिरातीवर खर्चास मनाई केली आहे. त्यावर आता १७ आॅक्टोबर कामकाज होणार असून तोपर्यंत तरी निविदा प्रक्रिया होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील ४० वाळू गटांना पर्यावरण समितीची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:23 PM
१७ आॅक्टोबरपर्यंत जाहिरात देता येणार नाही
ठळक मुद्दे पर्यावरण समितीची बैठक ३० सप्टेंबर रोजीच संपली वाळू गटांची मुदत