किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : रेवदंडा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गतवर्षी तालुक्यातील ५०९ सेवेकऱ्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या कृतीरूपी सेवेचा ध्यास घेतला होता. श्री सद्गुरू समर्थांच्या भक्तीरूपी कृतीशीलतेच्या ध्यासातून सुमारे ५०९ सेवेकऱ्यांनी ७५० वृक्षांचे संवर्धन करून पर्यावरणाचा विकास करण्यासाठी भक्तीरूपी साद घातली आहे.रावेर तालुक्यात डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रणित सेवेकरी सदस्यांचा असीम श्रध्दा असलेला मोठा भक्तवर्ग आहे. श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या निरूपणातून संसाराच्या भवसागरातील माणसाने परमार्थाची भक्ती कशी करायची? सत्संग, सदाचार, सत्शील, सत्कृत्य व सत्य आत्मसात करून कृतीशील व नामरूपी भक्तीतून मोक्षप्राप्तीचा संदेश साप्ताहिक बैठकीतून सदस्य सेवेकºयांना दिला जातो. त्या अनुषंगाने गत दोन वर्षांपासून शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत वनविभागाद्वारे तालुक्यातील डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानने २०-२० हजार अशी ४० हजार वृक्ष लागवड लालमाती व पाल येथील वनक्षेत्रात करण्यास सहकार्य केले होते.याशिवाय भवानी माता मंदिर परिसरात उटखेडा येथील श्री सद्गुरू समर्थ बैठक परिवारातील ७२ सदस्यांनी गतवर्षी २०७ वृक्षांची लागवड केली होती. उटखेडा येथील श्री सद्गुरू समर्थ सेवेकºयांनी भक्तीचा ध्यास घेऊन व दररोज ये-जा करून समूह पद्धतीने जाणीवपूर्वक पाणी व्यवस्थापन व रासायनिक खतांची मात्रा देणे तथा गुरा-ढोरांपासून संरक्षण करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारली होती. त्या पार्श्वभूमीवर उटखेडा येथील सेवेकºयांनी सुमारे ८ ते १० फूट उंच बहरलेल्या २०७ झाडांची वनराई कुलस्वामिनी श्री भवानी मातेच्या डोंगराच्या पायथ्याशी फुलवून पर्यावरणाला साद घातली आहे.यासोबतच सिंगत येथील श्री सद्गुरू समर्थ परिवारातील ४१ सदस्यांनी सिंगत येथील नवीन गावठाण व स्मशानभूमींच्या रस्त्यावर गतवर्षी लागवड केलेल्या १०० वृक्षांचे खतपाणी व्यवस्थापन व कुंपणाचे संरक्षण करून यशस्वी संवर्धन केले आहे. सावदा येथील स्मशानभूमी व रस्त्यावर श्री सद्गुरू समर्थ परिवारातील ५० सदस्यांनी १०२ वृक्षांची लागवड करून वर्षभरापासून संवर्धन केले आहे. श्री सद्गुरुंचा ध्यास घेतलेल्या रावेर शहरातील अष्टविनायक नगरमधील ३३ सेवेकºयांनी रावेर ग्रामीण रुग्णालय आवारात लागवड केलेल्या ७१ झाडांचे संवर्धन करून आपली भक्तीरूपी सेवा समर्पित केली आहे. तसेच शहरातील महात्मा फुले चौकातील ४८ सदस्यांनी कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणात श्री स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात व रसलपूर स्मशानभूमींच्या आवारात गतवर्षी लागवड केलेल्या १०० झाडांचे कृतीशील भक्तीतून सद्गुरू चरणी सेवा समर्पित केली आहे. धामोडी येथील २३ सेवेकºयांनी ग्रामपंचायतच्या शेताच्या बांधावर ८६ झाडांचे संवर्धन केले आहे. अजंदे येथील सेवेकरी ३७ सदस्यांनी ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयांच्या प्रांगणात ७६ झाडांचे संवर्धन करून भक्तीरूपी सेवा समर्पित केली आहे.दरम्यान, सावखेडा, कोचूर, न्हावी, थोरगव्हाण, वाघोड, मोरगाव व थेरोळे येथील श्री सद्गुरू समर्थ परिवारातील २१७ सेवेकरी सदस्यांनी स्मशानभूमी, रस्ते व श्री सद्गुरू समर्थ बैठकीच्या परिसरात गतवर्षी लागवड केलेल्या ३२६ वृक्षांचे श्री सद्गुरू समर्थांच्या कृतीशील भक्तीतून संवर्धन करण्यात आले आहे.शहर व तालुक्यात तथा लगतच्या न्हावी, ता.यावल येथील ५०९ सेवेकरीं सदस्यांनी श्री सद्गुरू समर्थांच्या नामरूपी ध्यासाने तल्लीन होऊन १ हजार १९ वृक्षांचे संवर्धन करून पर्यावरणाचा विकास साधण्यासाठी भक्तीरूपी सेवा समर्पित केली आहे.
रावेर येथे सद्गुरूंच्या ध्यासाने होतोय पर्यावरणाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 4:16 PM
रेवदंडा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गतवर्षी तालुक्यातील ५०९ सेवेकऱ्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या कृतीरूपी सेवेचा ध्यास घेतला होता. श्री सद्गुरू समर्थांच्या भक्तीरूपी कृतीशीलतेच्या ध्यासातून सुमारे ५०९ सेवेकऱ्यांनी ७५० वृक्षांचे संवर्धन करून पर्यावरणाचा विकास करण्यासाठी भक्तीरूपी साद घातली आहे.
ठळक मुद्देरेवदंडा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तालुक्यात होतेय वृक्षांचे संवर्धनपर्यावरणाचा विकास साधण्यासाठी भक्तीरूपी सेवा समर्पित