एरंडोल : शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळामुळे एरंडोल बसस्थानक परिसरातील लोटगाड्या महामार्गापर्यंत घसरत गेल्या. यामुळे लोटगाड्याधारकांचे मोठे नुकसान झाले. त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
वेळ वाढवून
मिळण्याची मागणी
पारोळा : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना आपली दुकाने सकाळी ७:०० ते सकाळी ११:०० वा. या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र हा वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
अमळनेरला लसीकरण
केंद्र वाढवून मिळावे
अमळनेर : शहरात मे महिन्यात फक्त ९ दिवस लसीकरण झाले आहे. त्यातही मागणीच्या तुलनेने लसींचा पुरवठा कमी होत आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी झुंबड उडत आहे. तिला आवरता- आवरता संबंधित यंत्रणेची खूपच दमछाक होत आहे.