एरंडोल, जि.जळगाव : येथील ऐतिहासिक पांडव वाड्याची भिंत रविवारी पहाटे अचानक अंशत: कोसळली. मात्र या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही.पहाटे पांडव वाड्याची भिंत अंशत: कोसळली तेव्हा या भिंतीजवळ कोणी नव्हते. यामुळे कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नाही.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच खासदार उन्मेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी एरंडोल शहराचा पुरातत्त्व वारसा जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. त्यांनी त्वरित राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक गर्ग यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधून पांडव वाड्याचे संवर्धन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सदर पांडव वाडा संवर्धनाची जबाबदारी पालिकेकडे देण्यात यावी व वैभव संवर्धन योजनेअंतर्गत जवाबदारी दिल्यास याठिकाणी सुशोभिकरण करण्यात येईल व पर्यटनासाठी एक नवे दालन शहरात कायमस्वरूपी उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी भाजप शहराध्यक्ष नीलेश परदेशी, जगदीश ठाकूर, रवींद्र पाटील, मयूर बिर्ला, सचिन विसपुते, भरत महाजन. आदी मान्यवर उपस्थित होते.
एरंडोल येथे पांडव वाड्याची भिंत पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 6:05 PM
ऐतिहासिक पांडव वाड्याची भिंत रविवारी पहाटे अचानक कोसळली. मात्र या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही.
ठळक मुद्देपरिसरात कोणीही नसल्याने हानी टळलीघटनास्थळी खासदारांची भेट व पाहणी