शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून हजार कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:38 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : समाजातील तरुणांना शैक्षणिक, व्यावसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : समाजातील तरुणांना शैक्षणिक, व्यावसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळास एक हजार कोटी रुपयांची महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासह इतर मागण्यांसाठी ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था व बहुभाषिक ब्राह्मण संघासह इतर संघटनांतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी ब्रह्मश्री बहुद्देशीय संस्था व बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी यांची ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा करण्यात आली. त्यापूर्वी आमदार सुरेश भोळे व महापौर भारती सोनवणे, कैलास सोनवणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्या जाणून घेतल्या होत्या.

अशा आहेत मागण्या

ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे, केजी टू पीजी शिक्षण मोफत करण्यात यावे, ब्राह्मण समाजाबाबत व महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण व वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटीप्रमाणे कायदा पारित करण्यात यावा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात यावे, पुरोहित समाजाला पाच हजार रुपये मानधन सुरू करण्यात यावे, वंश परंपरेने चालत असलेल्या मंदिरांचे सर्व अधिकार पूर्ववत पुजाऱ्यांकडे देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यांचा होता उपोषणात सहभाग

उपोषणात बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अशोक वाघ, संजय व्यास, सुरेंद्र मिश्रा, लेखराज उपाध्याय, महेंद्र पुरोहित, धनश्याम नागोरी, राजेश नाईक, गोपाळ पंडित, सौरभ चौबे, अजित नांदेडकर, दिनकर जेऊरकर, कमलाकर फडणीस, शिवप्रसाद शर्मा, चंद्रकांत पाठक, धनश्याम देशपांडे, डॉ. अजित नांदेडकर, भूपेश कुळकर्णी, शशिकांत एकबोटे, निरंजन कुळकर्णी, मिलिंद चौधरी, नंदू नागराज, राजेश कुळकर्णी, नीलेश कुळकर्णी, डॉ. महेंद्र जोशी, अनंता देसाई, मुकुंद धर्माधिकारी, डॉ. नीलेश राव, योगेश पाठक, व्ही.पी. कुळकर्णी, अशोक जोशी, हेमंत वैद्य, नवरंग कुळकर्णी, भरत कुळकर्णी आदींचा सहभाग होता तसेच ब्राह्मण सभा, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क, शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संघ, उत्तर भारतीय ब्राह्मण महासंघ, सिखवाल ब्राह्मण संघ, रामदासी ग्रुप, राजस्थानी ब्राह्मण संघ, सुरभि महिला मंडळ, गुजराथी ब्राह्मण संघ आदी ब्राह्मण समाजाच्या संघटनांचा सहभाग होता.