जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या पुढाकाराने अल्पसंख्यांक दिनानिमित्त या फोरमची स्थापना करण्यात आली. बौद्ध समाजाचे हरिश्चंद्र सोनवणे यांनी जळगावात अल्पसंख्यांक हक्क मंचाची स्थापना करण्याबाबत प्रस्ताव ठेवल्यानंतर या प्रस्तावास शीख समाजाचे जगजित सिंग काबरा व मुस्लिम समाजाचे मुफ्ती हारून यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर प्राथमिक स्वरूपात जळगाव मायनॉरिटी राइट्स फोरम ची स्थापना झाल्याची घोषणा ख्रिश्चन समाजाचे एसली रॉस व शीख समाजाचे कमल अरोरा यांनी केली.
या वेळी नव्याने स्थापन झालेल्या फोरम ने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना अल्प संख्याक बांधवाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये अल्पसंख्यांक अधिकार दिवस अंतर्गत शैक्षणिक ,आर्थिक व विकसनशील योजना ची अंमलबजावणी करण्यात यावी, ज्या अल्पसंख्यांक संस्थांना आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांना त्वरित सहाय्य उपलब्ध करून द्यावे, पंतप्रधान यांच्या १५ सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे मुफ्ती हारून नदवी, हरिश्चंद्र सोनवणे, अजय राखेचा, जिओ दरबारी, कमल अरोरा यांनी केल्या आहेत.