जळगाव : चोरी झालेल्या मोबाईलवरुन कर्नाटकच्या तरुणाने शहरातील एका महिलेला अश्लिल व्हिडीओ पाठविला. तांत्रिक माहितीच्या आधारावर सायबर पोलिसांनी दिनेश दौलाराम डी (२७, रा. भुवनेश्वरी, बंगळुरु, कर्नाटक, मुळ रा. पाली, राजस्थान) याला शुक्रवारी रात्री बंगळुरु येथून अटक केली. दिनेश याच्या मोबाईल क्रमांकावरुन शहरातील एका महिलेच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ आला होता. त्यानंतर त्यांचा क्रमांक फक्त मुलींचा गृप सांगून एका व्हॉटस्अॅप गृपमध्ये समाविष्ट केला होता. या गृपवर सर्व पुरुषच व त्यावर फक्त अश्लिल व्हिडीओ असल्याने पाहून पीडित महिलेला धक्काच बसला. तिने याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार निरीक्षक अरुण निकम यांच्या पथकातील ललित नारखेडे व सहकाऱ्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर दिनेश याला बंगळुरु येथून अटक केली. चौकशीत दिनेश याचा मोबाईल चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या क्रमांकावरुन दुसºयाच व्यक्तीने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने दिनेश याची जामीनावर मुक्तता केली. दिनेश याने मोबाईल चोरीबाबत पोलिसात तक्रारच केलेली नाही, त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत. पथक पुन्हा कर्नाटकात जाण्याची शक्यता आहे.एक चूक महागातदिनेश या तरुणाचा मोबाईल चोरी गेला, मात्र त्याने त्याबाबत ना पोलिसांना कळविले, ना कंपनीकडून सीमकार्ड बंद केले. पोलिसात तक्रार केली असती तर जळगाव पोलिसांकडून त्याला अटकच झाली नसती. ती एक चूक त्याला खूप महागात पडली. ज्या मोबाईलवरुन व्ंिहडीओ प्राप्त झाला तो मोबाईल व पाठविणारा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याआधी देखील अमळनेरच्या एका शिक्षकाने महिलेला अश्लिल व्हिडीओ पाठविल्या होता.
महिलेला अश्लिल व्हिडीओ पाठविला एकाने आणि निघाला दुसराच तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:33 PM