भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावल विभागामध्ये मंगळवारी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त मंडल रेल्वेचे प्रबधंक विवेककुमार गुप्ता यांनी सकाळी आठला रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरवात झाली.ही रॅली मंडल रेल्वे प्रबंधक कार्यालयापासून रेल्वे ग्राउंडकडील बुकंींग आॅफिसजवळून, हंबर्डीकर चाळ मार्गे गांधी चौक मार्ग, रेल्वे हॉस्पिटलजवळ सेवेज वॉटर प्रक्रिया प्रकल्पापर्यत काढण्यात आली. यामध्ये सेवेज वॉटर प्रक्रिया प्रकल्प येथे मंडल रेल्वे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी सांगितले, भुसावळ विभागामध्ये यंदा दोन लाख झाडे वृक्षारोपण करण्यात येणार आहेत. वृक्षारोपण करुन पर्यावरण बचावचा आणि वायू प्रदूषण मुक्त करण्याचा संदेश दिला.सेवेज वॉटर प्रक्रिया प्रकल्प येथे २५० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी अपर मंडल रेल्वे प्रबधंक मनोज सिन्हा, वरिष्ठ मंडल अभियंता (पर्यावरण आणि गृह प्रबंधक ) पी.रामचंद्रन, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता जी.के.लखेरा, वरिष्ठ मंडल अभियंता राजेश चिखले, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा, वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता लक्ष्मीनारायण, वरिष्ठ मंडल संरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, भुसावळ स्टेशन निर्देशक गोपी अय्यर, सी.डब्लू. स्टाफ, अनंत झोपे, संतोष श्रीवास आदी उपस्थित होते. रॅलीत रेल्वे स्काउट-गाईडचे विद्यार्थी तसेच अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
पर्यावरण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे भुसावळ येथे रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 4:05 PM
मध्य रेल्वेच्या भुसावल विभागामध्ये मंगळवारी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त मंडल रेल्वेचे प्रबधंक विवेककुमार गुप्ता यांनी सकाळी आठला रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरवात झाली.
ठळक मुद्देरॅलीत अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांचा सहभागरॅलीतून दिला पर्यावरणाचा संदेशवॉटर प्रक्रिया प्रकल्पात २५० वृक्षांचे रोपण