भुसावळ : कोरोना संदर्भात काळजी म्हणून गर्दी टाळणे महत्वाचे आहे. यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी जनेला रविवारी घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. यासाठी विभागात ठिकठिकाणी प्रशासनानेही जनतेला आवाहन केले आहे. तर रविवारी पूर्ण बाजारपेठ बंद राहील हे गृहीत धरुन किराणा व भाजीपाला खरेदीसाठी येथील बाजारात शनिवारी दिवसभर विशेषत: सायंकाळी तोबा गर्दी झाली होती. हेच चित्र अनेक ठिकाणी होते.प्रशासनासह व्यापारी, विविध संस्था व धार्मिक संस्थान आदींनीही बंदला प्रतिसाद दर्शविला आहे. भुसावळ येथील नाभिक संघाने जाहीर पाठिंबा व्यक्त केला.सावदा, ता. रावेर येथील जैन दिगंबर जैन मंदिरात सकाळी सहा वाजेपासून नित्य अभिषेक पूजन करण्यात येऊन त्यानंतर सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.बसेसही बंदजिल्ह्यातील महामंडळाची ९० टक्के बससेवा रविवारी बंद ठेवली आहे. यात भुसावळ आगाराने सर्वच बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान बोदवड येथे शनिवारी हॉटेल, टपऱ्या, मॉल, चित्रपट गृह त्याच प्रमाणे मंगल कार्यालय बंदचे आदेश प्राप्त झाल्याने नगरपंचायत कर्मचारी व पोलीस प्रशासन यांनी शहरात सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवा वगळता टपºया व हॉटेल बंद केल्या. तर एनगाव ग्रामपंचयात कर्मचारिना तसेच गावक?्यांना ग्रामपंचायत तर्फे मास्क वाटप करण्यात आले. सरपंच अन्नपूर्णा विनोद कोळी, उपसरपंच अनिता तळले, सदस्य उत्तम राणे, महेश किंनगे, प्रमोद झटकर, प्रफुल्ल तळले, सुषमा फिरके उपस्थित होते.प्रशासनाने शनिवारी सायंकाळ नंतर केली दुकाने बंदमहसूल व पोलीस प्रशासनाने भुसावळ सह विभागातील सर्वच शहरात शनिवारी सायंकाळनंतर बंदचे जाहीर आवाहन केले. काही ठिकाणी शनिवारी सायंकाळ नंतर काहीसा दबाव टाकत टपºया व किरकोळ विक्रेत्यांना घरचा रस्ता दाखवला.दहिगावात शनिवारीही बंदयावल : दहीगाव व सीमखेडा सीम येथील टपरीधारक तसेच व्यवसायिकांनी पोलीस पाटील संतोष जिवराम पाटील व पंकज बडगुजर यांच्या या सूचनेवरुन शनिवारपासूनच बंदला प्रतिसाद दिला.
जनता कर्फ्यूच्या पूर्वसंध्येस बाजारात तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 9:29 PM