जळगाव : जिल्हा प्रशासनाने व्यापारी संकुलातील दुकानदारांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी देऊन, फक्त आॅनलाईन व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, बहुतांश व्यवसायिकांना आॅनलाईन व्यावसायाची कुठलीही माहिती नसून अशा प्रकारच्या व्यवसायाची या ठिकाणी प्रथा नाही. त्यामुळे व्यावसायिकांनी बुधवारीदेखील दुकाने बंद ठेऊन, सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याच्या मागणीसाठी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी भेट घेतली.लहान मोठ्या व्यापारी संकुलातील दुकानदारांना २० जुलैपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आॅनलाईन विक्रीला परवानगी देण्यात आली असल्यामुळे आणि दुसरीकडे बाजारपेठेतील रस्ते बंद करून ठेवण्यात आल्यामुळे व्यावसिकांना माल पोहचविण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, आॅनलाईन व्यावसायाबद्दल बहुतांश व्यावसायिकांना माहिती नसल्यामुळे, दुकाने बंद ठेऊन जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यात येत आहे. बुधवारी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बहुतांश व्यापाºयांनी दुकाने उघडली नाहीत. काहींनी साफसफाई आणि पूजा करून लगेच दुकाने बंद केली होती.हॉकर्सने मात्र थाटली ठिकठिकाणी दुकानेबुधवारीदेखील व्यापाºयांनी दुकाने न उघडल्यामुळे या ठिकाणी कपडे, बुट, सौदर्य प्रसाधने आदी विक्रेत्यांनी फुले मार्केटच्या आत आणि बाहेर दुकाने थाटली होती. यावेळी खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे, सोशल डिस्टनिंगचा फज्जा उडला होता. या संदर्भात काही व्यापाºयांनी मनपाच्या अधिकाºयांना माहिती देऊनही, कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले.आॅनलाईन व्यावसाय करता येत नसल्यामुळे, दुकाने उघडण्यासाठी परवानगी देऊन उपयोग काय आहे, असा प्रश्न उपस्थित करित महात्मा फुले मार्केटातील व्यापाºयांनी बुधवारी सायंकाळी मनपात उपायुक्तांची भेट घेतली. आॅनलाईनची पद्धत रद्द करून, समविशम पद्धतीने दुकाने सुरू करण्याची मागणी केली. सोशल डिस्टनिंगचे पालन करून व्यावसाय करण्याचे आश्वासनही व्यापाºयांनी यावेळी दिले. यावर उपायुक्तांनी व्यापाºयांचे म्हणणे ऐकून घेत, या संदर्भात आयुक्तांची भेट घेण्याचे व्यावसायिकांना सांगितले. यावेळी सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मताणी, कार्याध्यक्ष बाबू कोराणी, राजेश वरयानी, बबलू समदडीया आदी व्यापारी उपस्थित होते.
परवानगी मिळूनदेखील तिसऱ्या दिवशीही संकुलातील दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:25 PM