आॅनलाईन लोकमतरावेर, दि.१५ - तालुक्यातील निरूळ येथील कांतीलाल उर्फ सोपान छन्नू पाटील यांच्या मातीच्या घराचा खांब शनिवारच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अचानक खचल्याने मातीच्या धाब्याचे छत कोसळून तब्बल चार फूट मातीच्या ढिगाºयाखाली त्यांचा मुलगा, सून व दहा महिन्यांचा चिमुरडा वेदांत दबल्याची घटना घडली. कुटुंबिय व शेजाºयांनी तब्बल चार फूट ढिगारा उपसत सर्वांना बाहेर काढले. या घटनेत पती, पत्नी व दहा महिन्यांचा चिमुरडा सुखरूप बचावल्याने देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय नागरिकांना आला.निरूळ येथील प्रगतशील शेतकरी कांतीलाल उर्फ सोपान छन्नू पाटील हे त्यांचे भाऊ हिरालाल व एस टी चालक नामदेव पाटील या तिन्ही भावांच्या एकत्रित कुटूंबपध्दतीने आईवडिलांसह एकाच घरात राहतात. शुक्रवारच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा खांब जमीनीत खचला. धाब्याचा मातीचा ढिगारा व धाब्याचे छताच्या लाकडी सरे तथा कड्या थेट मुलगा राहूल कांतीलाल पाटील (वय २६), सुन शितल पाटील व १० महिन्यांचा नातू वेदांत यांच्या अंगावर कोसळले.छत कोसळताच मोठा आवाज झाल्याने व ढिगाºयाखाली दबलेल्या साखरझोपेतील दाम्पत्याने आरडाओरडा करताच कुटुंबियांसह शेजारील दगडू पाटील, जगन्नाथ पाटील, सरपंच बंडू पाटील यांनी धाव घेतली. तब्बल चार फूट मातीचा ढिगारा उपसून तिघांना सुखरूप बाहेर काढले. तब्बल चार फूट मातीचा ढिगारा उपसण्यासाठी वीस मिनिटे लागली. मात्र तरीही तिघे जण सुखरुप बचावल्याने त्यांचे दैव बलवत्तर असल्याचे भावना व्यक्त केल्या जात आहे. राहूल पाटील यांच्या पाठीला मार लागला आहे. दरम्यान, अहिरवाडी तलाठी विठोबा पाटील यांनी पडक्या घराचा पंचनामा केला आहे. मात्र त्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल सादर दिला आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
चार फुट मातीच्या ढिगाऱ्याखाली २० मिनीटे राहिल्यानंतरही मातापित्यासह १० महिन्याचा चिमुकला सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 6:34 PM
निरूळ येथे घराचा खांब खचल्याने छत कोसळले
ठळक मुद्देचार फुट ढिगा-याखाली दबल्यानंतरही तिघे सुखरुप२० मिनीटांच्या प्रयत्नानंतर उपसला ढिगारापती व पत्नीसह १० महिन्याचा चिमुरडा सुखरुप