चाळीसगाव : तीन वर्षे उलटूनही अनुदानाचा पहिला हप्ता घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पं.स. मार्फत नोटिसा बजावण्यात येणार आहे. यानंतरही बांधकाम पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर फौजदारी नोंदविण्यात येणार असल्याने खळबळ उडाली आहे. लाभार्थ्यांनी अनुदानाच्या रकमेचा पहिला हप्ता तीन वर्षांपूर्वी घेतला आहे.
पंतप्रधान ग्राम आवास योजनेंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तालुक्यात ८०४ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रत्येकी एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते.
...........
चौकट
७९ लाभार्थी रडारवर
२०१७-१८ मध्ये तालुक्यात पंतप्रधान ग्राम आवास योजनेंतर्गत ८०४ घरकुले मंजूर केली गेली. यापैकी ७२५ लाभार्थ्यांनी अनुदान घेऊन एका वर्षात घरकुलाचे काम पूर्ण केले.
1...मात्र ७९ लाभार्थ्यांनी गत तीन वर्षांत वेळोवेळी सूचना देऊनही बांधकाम पूर्ण न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
.....
चौकट
२५ रोजी लोक अदालतीत होणार फैसला
घरकुले अपूर्ण ठेवणाऱ्या लाभार्थ्यांसाठी २५ रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ७९ लाभार्थ्यांना लोक अदालतीत उपस्थित राहण्यासाठी नोटिसा देण्यात येणार आहेत.
- नोटिसा बजावल्यानंतर लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितल्यास ती सवलत दिली जाणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत घरकुलाचे काम पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
- लाभार्थ्यांनी यानंतरही काम पूर्ण न केल्यास त्यांच्याकडून पहिल्या हप्त्याची १५ हजार रुपयांची रक्कम वसूल केली जाणार आहे. घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानाची उर्वरित रक्कमही तत्काळ अदा करण्यात येणार आहे.
.....
इन्फो
तालुक्यातील ७९ लाभार्थ्यांनी तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही घरकुलाचे काम पूर्ण केलेले नाही. त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. २५ रोजी लोक अदालत आहे. यानंतरही काम पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून पहिल्या हप्त्याची १५ हजार रुपये रक्कम वसूल केली जाईल.
- नंदकुमार वाळेकर,
गटविकास अधिकारी, चाळीसगाव