संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करून पोटाची खळगी भरण्यासाठी आटापिटा करणाºया तालुक्यातील शिरूड येथील शेतकºयाचे जीवन पालटून सुखाचे दिवस आणणाºया सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकºयाने आपल्या विहिरीला ‘बैलांची पुण्याई’ नाव देऊन सहा वर्षांपासून त्यांची डीजे लावून मिरवणूक काढत आहे.तालुक्यातील शिरूड येथील बारकू दौलत पाटील हे अतिशय खालावलेल्या परिस्थितीमुळे खूप कष्ट केले. कुटुंबाची उपजीविका करणे कठीण होते. बारकू यांनी कष्टमय जीवनातून बाहेर पडण्यासाठी सहा वर्षांपूर्वी दोन टक्के व्याजाने कर्ज काढून बैलजोडी विकत घेतली आणि फक्त एक एकर मालकी असलेली शेती कसायला घेतली. त्या बिचाºया सर्जाराजाच्या प्रचंड प्रामाणिक परिश्रमामुळे बारकू पाटीलचे जीवन पालटले. हळूहळू प्रगती झाली. कर्ज फिटले, मोटरसायकल घेतली, मुले मोठी झाली. दोन मुलांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अत्याधुनिक स्टडी टेबल घेतले. विहीर बांधली. आता स्वत:चे पक्के घर बांधायला सुरुवात केली. ज्या सर्जाराजाच्या जीवावर दोन वेळचे सुखाचे अन्न मिळू लागले. प्रगती होऊन स्वत: अशिक्षित असताना मुलांच्या शिक्षणाला दिशा मिळाली त्यांच्यासाठी काही तरी म्हणून विहिरीला ‘बैलांची पुण्याई’ नाव तर दिलेच पण विशेष म्हणजे एकमेव जोडीसाठी पोळ्याच्या दिवशी डीजे वाद्य लावून बैलांना एखाद्य नववधूप्रमाणे सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यासाठी १० ते १५ हजार रुपये खर्च होतात. शेती असूनही परवडत नाही असेच म्हणणाºया शेतकऱ्यांसाठी अवघ्या एक एकर शेतीत बैलांच्या जीवावर सुखी जीवन जागून त्यांच्यासाठी एवढा खर्च करणारा बारकू पाटील आदर्श उदाहरण आहे.आपल्या घरालादेखील त्याने बैलांची पुण्याई नाव देण्याचे ठरवले आहे. आपल्या बैलांना तो मुलांप्रमाणे जीव लावतो. दिवसभर कष्ट करून रात्री स्वत: अशिक्षित असतानाही मुलांच्या अभ्यासावर आवर्जून लक्ष ठेवतो.
सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा असाही प्रयास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 8:15 PM
हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करून पोटाची खळगी भरण्यासाठी आटापिटा करणाºया शिरूड येथील शेतकºयाचे जीवन पालटून सुखाचे दिवस आणणाºया सर्जाराजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकºयाने आपल्या विहिरीला ‘बैलांची पुण्याई’ नाव देऊन सहा वर्षांपासून त्यांची डीजे लावून मिरवणूक काढत आहे.
ठळक मुद्देअमळनेर तालुक्यातील शिरुड येथील शेतकऱ्याची धडपडविहिरीला दिले नाव ‘बैलांची पुण्याई’घरालाही नाव देणार ‘बैलांची पुण्याई’