रमेश पाटील
केऱ्हाळा, ता.रावेर : लहानपणीनच पितृ छत्र हरवलेला येथील बत्तीस वर्षीय सरफराज तडवी शिक्षित होता . मोलमजुरी करीता पपई भराई भरण्यासाठी तो गाडीवर गेला होता . पोटाला रोजगार देणारी गाडीच जीवावर उठेल अशी कल्पनाही डोक्यात आली नसेल , मात्र याच गाडीने क्षणात होत्याचे नव्हते केले . किनगाव जवळील अपघातात घरातील एकमेव कर्ता सरफराजवर काळाने क्रूर घाला घातला. त्याच्या पश्चात आई , पत्नी, चार वर्षाच्या आतील दोन मुली असा परिवार असून हेह सर्व कुटुंब पोरकं झाल्याची दुर्दवी वेळ आली आहे . त्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . के-हाळे खुर्द येथील एकूण तीन मजुरांपैकी सरफराज अपघातात मृत्यु पावला तर सत्तार तडवी व युनूस तडवी हे सोबतीला असलेले मित्र जखमी असून उपचार घेत आहेत .