ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28 - जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 83 हजार 495 लाभार्थ्ीपैकी आतार्पयत 12 हजार 797 लाभार्थ्ीना हक्काचे घरकूल मिळाले आहे. उर्वरित लाभार्थ्ीनाही टप्प्याटप्प्याने व 2020 र्पयत प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल, त्यादृष्टीने प्रय} सुरूअसल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे (डीआरडीए) प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे यांनी दिली. ‘लोकमत’ कार्यालयास बगाडे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. या वेळी त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ग्रामीण भागातील घरकुलांसाठी तीन योजना2011 मध्ये सामाजिक, आर्थिक व जात सव्रेक्षण करण्यात आले. या सव्रेक्षणात ब पत्रकात समावेश असलेल्या ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थीला हक्काचे घर मिळणार आहे. अशा एकूण लाभार्थ्ीची संख्या 83 हजार 494 आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी, रमाई व पारधी आवास या तीन योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात येतो. घर उभारणीसाठी एक लाख 20 हजार रुपयेबगाडे म्हणाले, लाभार्थीला स्वत: घर उभारावे लागते, त्यासाठी त्याला शासनाकडून तीन टप्प्यात एक लाख 20 हजार रुपये देण्यात येतात. ही संपूर्ण रक्कम थेट त्याच्या खात्यात (डीबीटी) जमा होत असते. घरकूल मिळावे, यासाठी कुणाकडेही वशिला लावण्याची गरज नाही. जळगाव राज्यात आघाडीवरघरकुलांचा लाभ लाभार्थ्ीना देण्यात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. आतार्पयत 12 हजार 797 नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळाला आहे, उर्वरितांनाही टप्प्याटप्प्याने लाभ मिळेल व सर्वाना 2020 र्पयत घर देण्याचा प्रय} असल्याचे बगाडे यांनी सांगितले.जागा खरेदीसाठीही 50 हजार रुपये मदतकेवळ घरासाठीच नव्हे, तर जागा खरेदीसाठीही शासनाची पंडित दीनदयाल उपाध्याय योजना आहे. प्रती लाभार्थीस 50 हजार रुपये मदत दिली जाते. या योजनेचाही लाभ जिल्ह्यातील लाभार्थी घेत आहेत. मुक्ताईनगरसाठी साडेनऊ कोटीशासनाची रुरल अर्बन योजना आहे, त्यासाठी मुक्ताईनगरची निवड करण्यात आली आहे. तीन वर्षासाठीचा 50 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आतार्पयत या योजनेंतर्गत साडेनऊ कोटींचा निधी खर्च झाला असल्याचेही बगाडे यांनी सांगितले. बचत गटांसाठी जळगावात कायमस्वरुपी बाजारपेठजिल्ह्यात अनेक महिला बचत गट स्तुत्य कार्य करीत आहे. त्यांनी बनविलेल्या वस्तू व खाद्य पदार्थाना मोठी मागणी असते. त्यामुळे जळगाव शहरात कायमस्वरुपी बाजारपेठ मिळावी, यासाठी जागेचा शोध सुरू आहे. एकाच छताखाली विविध वस्तूंची विक्री त्यांना तेथे करता येईल, अशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची योजना आहे. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल अथवा राजकमल टॉकीज चौक परिसरातील जिल्हा परिषदेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांमध्ये बचत गटांसाठी ही सुविधा करण्यात येणार असल्याचे विक्रांत बगाडे यांनी सांगितले. यांना मिळेल घरकूल़़़ 2011 मध्ये सामाजिक, आर्थिक व जात सव्रेक्षणात ब पत्रकात समावेश असलेल्यांना घरकुलाचा लाभ मिळतो. त्यासाठी ग्रामसेवक व गटविकास अधिका:यांशी संपर्क साधावा. घरकूल मिळावे यासाठी कुणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही, तसेच कुणी आपल्याला घरकूल मिळवून देतो, असे आमिष दिल्यास त्याला कुणी बळी पडू नये. अधिक माहितीसाठी नागरिकांनी आयवाय डॉट एनआयटी डॉट इन अथवा पीएमएवायजी डॉट एनआयटी डॉट इन या वेबसाईटवर भेट द्यावी, असेही विक्रांत बगाडे म्हणाले.