ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.5 - समाजाचा घटक बनून पोलिसांना काम करायला आवडेल़ चांगले काम करण्याची ग्वाही देतो, असे सांगत प्रत्येक नागरिक साध्या वेशातील पोलीसच आह़े त्यामुळे आपल्या गावात, समाजात शांतता टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे मत नूतन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी भुसावळ येथे व्यक्त केल़े
रमजाननिमित्त शांतता समितीची बैठक नगरपालिका सभागृहात झाली़ याप्रसंगी ते बोलत होत़े ते म्हणाले की, आम्ही सण साजरे करू शकत नाही कारण नेहमीच आमच्या हाती बंदोबस्ताची काठी असत़े मात्र भुसावळकरांनी शांततेची ग्वाही दिल्याने आम्हीदेखील आता सणात सहभागी होवून सण साजरे करणार आहोत़
नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शहरवासीयांना उत्सव काळात पथदिवे सुरू केल्याचे सांगत लवकरच सर्व समस्या निकाली काढू, असे आश्वासन दिल़े व्यासपीठावर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांची उपस्थिती होती़ प्रास्ताविक बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे तर आभार शहरचे निरीक्षक वसंत मोरे यांनी मानल़े