ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17 - कुजलेल्या जनावराप्रमाणे दुपारनंतर हळूहळू वाढत जाणा:या दरुगधीमुळे घरात बसणे मुश्कील होते. डोळे चुळचुळतात. पाणी येते व मळमळते, अशी कैफियत ज्ञानदेव नगर, योगेश्वर नगर, सागर नगर, श्रीकृष्ण नगर व परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे मांडली. ही समस्या तातडीने सोडवावी यासाठी ज्ञानदेव नगरातील महिलांनी शनिवारी दुपारी रस्त्यावर येऊन निदर्शने केली.शहरातील कालिंका माता परिसर, ज्ञानदेव नगर, सागर नगर, श्रीकृष्ण नगर, सुनंदीनी पार्क, सदाशिव नगर यासह खेडी भागात दरुगधीयुक्त वासाने गेल्या चार दिवसांपासून नागरिक त्रस्त आहेत. नेमका वास कोठून येतो याचा शोध घेण्याच्या प्रय}ही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका:यांकडून घेतला जात आहे, मात्र अद्यापही शोध लागलेला नाही. या भागात ‘लोकमत’ चमूने पाहणी करुन अबालवृद्धांच्या व्यथा जाणून घेतल्या. ज्ञानदेव नगरालगतच्या भागात काही लहान मुलांना अस्वच्छता व पाण्याच्या डबक्यांमुळे डेंग्यू झाल्याची तक्रारही नागरिकांनी केली. गटारी तुंबलेल्या असून मोकळया प्लॉटवर गवत वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गटारींवरील गवतामुळे डास प्रचंड वाढले असून साथीच्या आजाराने नागरिक हैराण आहेत. साफसफाई करणा:यांना पैसे द्यावे लागतात मगच ते गवत काढतात.महापौर ललित कोल्हे यांनीही या भागात फिरकून पाहिले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
कालिंकामाता परिसरात भेट दिली असता तेथील महिलांनी एकत्र येऊन कैफियत मांडली. दुपारी 3 वाजेनंतर दरुगधीयुक्त वास सुरू होतो. तो सायंकाळर्पयत वाढत जातो. रात्री आठ वाजेच्या दरम्यान या वासामुळे घरात बसणे कठीण होते.डोळे चुळचुळतात, त्यातून पाणी येते. लहान मुलांना या वासामुळे मळमळते व जेवताना ते कोरडय़ा ओका:या देतात. यात वयोवृद्ध तसेच दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना जास्त त्रास होतो. त्यांना श्वास घ्यायला कठीण जात असल्याच्या तक्रारी या महिलांनी केल्या. प्रशासनाने यावर तत्काळ मार्ग काढण्याची मागणी रहिवाशांनी केली.