शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

ईव्हीएम घोटाळ्याचे पुरावे लवकरच कोर्टात देणार - मदन शेळके यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:59 PM

घोळ करण्यासाठीच नियमांना फाटा

ठळक मुद्दे१० कोटींचा दावा दाखल करणारपराभूत उमेदवार व समर्थकांची प्रचंड गर्दी

जळगाव : मतदान यंत्रावर नियमानुसार मुळाक्षरांच्या क्रमवारीनुसार उमेदवारांची नावे घेणे गरजेचे आहे. परंतु केवळ घोळ करण्यासाठीच मनपा निवडणुकीत क्रमवारीनुसार नावे घेण्यात आली नाहीत. हा ईव्हीएम घोटाळ्याशी संबंधित एक मुद्दा असून जळगाव मनपा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याचे आपल्याकडे अनेक पुरावे आहेत, ते आपण न्यायालयातच सादर करु, अशी माहिती अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते मदन शेळके यांनी पत्रपरिषदेत दिली.शनिवारी दुपारी पत्रकार भवनात ही पत्रपरिषद झाली. यावेळी काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, उल्हास साबळे, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, अमोल कोल्हे यांची मुख्य उपस्थिती होती.जळगाव, सांगली व अमरावतीच्या निवडणुकीबाबत आयोगाकडे तक्रारसुमारे ५ महिन्यापूर्वी झालेल्या अमरावती येथील मनपा निवडणुकीतही इव्हीएम घोटाळा झाला असून याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली असल्याचे शेळके यांनी सांगितले.आता सांगली आणि जळगावचीही तक्रार आपण केली आहे.प्रभाग ८ आणि १८ मध्ये काही दिवसातच वाद उद्भवणारप्रभाग ८ अ आणि १८ ड मध्ये काही दिवसातच वाद उद्भवणार, असेही भाकितही शेळके यांनी केले मात्र काय व कसा वाद उद्भवणार हे नेमकेपणाने त्यांनी सांगितले नाही.दाखवले नाहीत पुरावेमदन शेळके यांनी मनपा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर दुसऱ्याच दिवशी या निवडणुकीत इव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करुन न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्याबाबतची माहिती देण्यासाठी शनिवारी जळगावात आले होते. ते काय माहिती आणि पुरावे देतात हे जाणून घेण्यासाठी शहरातील बहुसंख्य पराभूत उमेदवार हे यावेळी उपस्थित होते मात्र निवडणूक घोटाळ्यासंबंधीचे पुरावे केवळ न्यायालयात सादर करु असे सांगत त्यांनी पत्रकारांनाही पुरावे दाखवले नाहीत.१० कोटींचा दावा दाखल करणारनिवडणूक रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणे आवश्यक असते. परंतु पैशांअभावी आपण अमरावती मनपा संबधी अद्यापही न्यायालयात जावू शकलो नाही, असे सांगत लवकरच अमरावती आणि जळगाव मनपा निवडणुकीतील घोटाळ्याबाबत न्याय मिळावा यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी असून १० कोटींचा दावा संबंधित विजयी उमेदवार आणि अधिकाºयांविरुद्ध करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. याचबरोबर यापूर्वीच आपण अनेक चुकीच्यापद्धतीने निवडून आलेल्या जळगावातील उमेदवारांची यादी जाहीर केली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.बटन दाबल्यानुसार होत नाही मतदान...घोटाळा हा शासकीय अधिकाºयांना हाताशी धरुनच केला जातो. इव्हीएम मशीनवर मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे (अल्फाबेटीकल) उमेदवारांची नावे नसले तरी अधिकाºयांच्या मशीनमध्ये ते मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे असतात. उदाहरणार्थ मतदाराने २ नंबरवर असलेल्या झाडे नावाच्या उमेदवारास जर मत टाकले तर ते झाडे यांना मिळत नाही. कारण अधिकाºयाकडील यंत्रामध्ये अल्फाबेटीकल प्रमाण नावे असतात त्यात झाडे हे नाव शेवटी असते त्यामुळे हे मत झाडे यांना न मिळता अधिकाºयाच्या यंत्रानुसार २ क्रमांकावर जो उमेदवार असतो त्याला ते मतदान जाते. आणि हा घोळ करण्यासाठीच मतदान यंत्रावर (मतपत्रिकेवर) अल्फाबेटीकल प्रमाणे नावे टाळल्याचे शेळके यांनी यावेळी सांगितले.पराभूत उमेदवार व समर्थकांची प्रचंड गर्दीपत्रपरिषदेला पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थकही आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. मध्येच कोणीही प्रश्न विचारत असताना काहीवेय गोंधळही झाला. राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मंगला पाटील यांनी भाजपाने सत्तेचा दुरुपयोग निवडणूक कालावधीत केल्याचा आरोप केला. पोलीस तक्रारींकडे दुर्लक्ष करीत होते असा आरोपही त्यांनी केला.घोटाळा उघडकीय यावा यासाठी लढवली होती विधानसभा निवडणूकइव्हीएम घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आपण विधानसभा निवडणूक लढवली होती अशी माहितीही शेळके यांनी दिली. त्यावेळी मतदरांना मतदान चिठ्ठी शासकीय यंत्रणेकडून घरपोच मिळावी अशी मागणी आयोगाकडे केली होती. ती मागणी मान्य होवून आता अंमलबजावणी होवू लागल्याचेही त्यांनी सांगितले.फडणीस आणि रावल घोटाळा करुन निवडून आले!मुख्यमंत्री देंवद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले, जयकुमार रावल, विनोद तावडे, सुधीर मुनगट्टीवार आदी गेल्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा करुन निवडून आले, असाही आरोप शेळके यांनी केला आहे. दरम्यान आपले कोणतेही आरोप खोटे असतील तर आपल्यावर गुन्हा दाखल करावा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.निवडणूक आयोगाचे आव्हान का स्वीकारले नाही?इव्हीएममध्ये घोटाळा होवू शकत असले तर तो सिद्ध करुन दाखवावा, असे आव्हान निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावेळी आपण ते आव्हान का स्विकारले नाही, असे विचारले असता शेळके यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. मला पुढे काय घोटाळे होतात हे पहायचे होते, असे उत्तर त्यांनी दिले.घोटाळा कसा करता येतो ते सांगा- कैलास सोनवणेइव्हीएम घोटाळा कसा होतो हे जाणून घेण्यासाठी माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे देखील उपस्थित होते. कसा घोटाळा करता येतो हे आम्हाला सांगा ... म्हणजे आम्हाला निवडणुकीत मेहनतच घेण्याची गरज पडणार नाही.. असेही ते उपहासाने म्हणाले परंतु शेळके त्यांना समाधानकारक उत्तर देवू शकले नाही.अधिकारी बनले भाजपाचे कार्यकर्ते- शिवराम पाटीलडीवायएसपी सचिन सांगळे व इतर अधिकाºयांनी निवडणुकीत भाजपाचे काम केले. प्रभाग १६ मधील सेंट लॉरेन्स मतदान केंद्रावर झालेल्या वादाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मतदान केंद्रात शिरलेल्या गाडीचा नंबर बदलण्यात आला. एकीकडे सामान्य माणसावर फिर्यादीची वाट न पाहता गुन्हा दाखल केला जातो मात्र या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे देखील या ठिकाणी येवून गेलेत मात्र त्यांनीही फिर्याद दिली नाही, असेही शिवराम पाटील यावेळी म्हणाले.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव