जळगाव : मनपा निवडणुकीत शासकीय कर्मचाºयांच्या संगनमताने मतदान यंत्रात फेरफार करून शासनाने आपल्या पसंतीचे उमेदवार निवडून आणले असल्याचा धक्कादायक आरोप अमरावती येथील रहिवासी मदन शेळके यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी शेळके यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.मनपा निवडणुकीत भाजपाने ५७ जागा मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. मात्र, निवडणूक निकाल जाहीर होण्याचा तिसºयाच दिवशी निवडणुकीच्या निकालाबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. शेळके यांनी केलेल्या तक्रारीत थेट शासन कर्मचाºयांवर गंभीर आरोप केले आहेत. शेळके यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, १९ प्रभागातील ७५ जागांसाठी घेण्यात आलेली निवडणूक ही आयोगाच्या नियमाला डावलून आपल्या पसंतीच्या उमेदवार निवडून यावा यासाठी बनावट दस्त तयार केले आहेत. तसेच हे बनावट दस्त प्रसिध्द करण्यात आले असून, प्रभाग निहाय जे अधिकारी नेमलेले होते तेही तेवढेच जबाबदार व दोषी असल्याचे या तक्रारीत शेळके यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत उच्च न्यायालयात सर्व दस्त दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.राष्टÑवादी, शिवसेनेचे पदाधिकारी भेट घेणारमदन शेळके यांनी केलेल्या दाव्यानंतर मंगळवारी शहरातील राष्टÑवादी कॉँग्रेस व शिवसेनेचे काही पदाधिकारी शेळके यांची अमरावतीला भेट घेणार असल्याची माहिती शेळके यांनी दिली आहे. याभेटीमध्ये सर्व पदाधिकाºयांना ‘इव्हीएम’ घोटाळ्यातील महत्वाची माहिती देणार असल्याचेही शेळके यांनी सांगितली आहे. शेळके यांनी निवडून आलेल्या ५० उमेदवारांसोबत त्या प्रभागात इव्हीएम मध्ये घोळ झाला नसता तर कोण निवडून येणार होते याचीही माहिती या तक्रारीत दिली आहे.आयुक्तांकडून निवडणुकीचा खर्च वसुल करावामतदान यंत्रात फेरफार करुन ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली असून, या प्रकरणी विजयी झालेले उमेदवार व मुख्य निवडणूक निर्णय अधिकाºयांवर पोलीस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आयुक्तांची बडतर्फीकरून निवडणुकीचा झालेला खर्च आयुक्तांकडून वसुल करण्याची मागणीही शेळके यांनी केली आहे. लोकशाहीची विटंबना केल्याप्रकरणी आयुक्तांवर देशद्रोह व राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा शेळके यांनी दिला असून निवडून आलेले उमेदवार व शासनाविरुध्द दहा कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा देखील शेळके यांनी दिला आहे. तसेच शासकीय अधिकाºयांनी आपल्या पसंतीचे ५० उमेदवार निवडून आणले असल्याचा गंभीर आरोप शेळके यांनी केला आहे.
जळगावात अधिकाऱ्यांचा संगनमताने मनपा निवडणुकीत इव्हीएम घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:35 PM
मनपा निवडणुकीत शासकीय कर्मचाºयांच्या संगनमताने मतदान यंत्रात फेरफार करून शासनाने आपल्या पसंतीचे उमेदवार निवडून आणले असल्याचा धक्कादायक आरोप अमरावती येथील रहिवासी मदन शेळके यांनी केला आहे.
ठळक मुद्देमदन शेळके यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार१० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशाराभाजपाने ५७ जागांवर मिळविला विजय