जामनेर,दि.28- बेकायदेशीर कर्जाची उचल करणे तसेच पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी त्यांनी पोलीस स्टेशनला हजेरी लावली. या दरम्यान, त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्यासोबत चर्चा केली.
जामनेर येथील सुरेशदादा जैन नागरी पतसंस्थेतून बेकायदेशीर कर्जाची उचल करणे तसेच फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन ईश्वर धारिवाल, व्हा.चेअरमन पारसकुमार जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह 35 जणांविरूद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी सुरेशदादा जैन यांना जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार सुरेशदादा जैन यांनी शुक्रवारी सकाळी जामनेर पोलीस स्टेशनला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत त्यांच्या निवासस्थानी काही वेळ चर्चा केली.