विलास बारी
जळगाव : पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी मिळतो म्हणून बहुतांश क्षेत्रात शासकीय नोकरांना पसंती असते. मात्र आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत जनतेची सेवा करणाऱ्या माजी आमदारांना पदावरून उतरल्यानंतर शासन पेन्शन देत आहे.
जनतेचा प्रतिनिधी म्हणून विधान भवन किंवा विधान परिषदेत गेलेल्या आमदारांना शासनाने पेन्शन योजना लागू केली आहे. त्यातही आमदाराच्या कालावधीनुसार ही पेन्शनची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.
माजी आमदारांच्या मृत्यूपश्चात वारसांना पेन्शन
शासनाकडून माजी आमदारांना पेन्शन दिले जात असताना एखाद्या माजी आमदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना ४० हजारांची रक्कम पेन्शन स्वरूपात देण्यात येते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ९ माजी आमदारांच्या वारसांना प्रत्येकी ४० हजारांची रक्कम पेन्शन स्वरूपात अदा केली जात आहे.
एकनाथ खडसे, सतीश पाटील यांना मोठे पेन्शन
मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांचा आमदारकीचा कालावधी जास्त असल्याने त्यांना पेन्शन स्वरूपात मिळणारी रक्कम एक लाखाच्या घरात आहे. त्यापाठोपाठ पारोळ्याचे माजी आमदार डाॅ. सतीश पाटील, अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव पाटील, रावेरचे माजी आमदार रमेश चौधरी, चाळीसगावचे माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे यांचे पेन्शन ७० हजारांच्या घरात आहे.
अन्य जिल्ह्याच्या कोषागारामधून पेन्शनची सुविधा
जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील कोषागार कार्यालयांतून पेन्शन घेण्याची सुविधा माजी आमदारांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही माजी आमदारांकडून पुणे, मुंबई व नाशिक येथील कोषागार कार्यालयातून शासनाकडून देण्यात येत असलेली रक्कम स्वीकारली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
माजी आमदार महिन्याला मिळणारे पेन्शन
प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे, चोपडा : ५० हजार
प्रा. साहेबराव घोडे, चाळीसगाव : ७० हजार
दिलीपराव सोनवणे, शिक्षक आमदार : ५२ हजार
रमेश विठ्ठल चौधरी, रावेर : ७० हजार रुपये
डाॅ. गुरुमुख जगवाणी, विधान परिषद : ५६ हजार रुपये
स्मिता उदय वाघ, विधान परिषद : ५० हजार रुपये
गुलाबराव वामनराव पाटील, अमळनेर : ७० हजार रुपये
नीळकंठ चिंतामण फालक, भुसावळ : ५० हजार रुपये
दिलीप आत्माराम भोळे, भुसावळ : ६० हजार
राजीव अनिल देशमुख, चाळीसगाव : ५० हजार रुपये
ईश्वर रामचंद्र जाधव, चाळीसगाव : ५० हजार रुपये
कैलास गोरख पाटील, चोपडा : ५० हजार रुपये
जगदीश रमेश वळवी, चोपडा : ५० हजार रुपये
पारूताई चंद्रभान वाघ, एरंडोल : ६० हजार रुपये
मनिष ईश्वरलाल जैन, विधान परिषद : ५० हजार रुपये
ईश्वरलाल शंकरलाल जैन, जामनेर : ५२ हजार रुपये
जयप्रकाश पुंडलिक बाविस्कर, विधान परिषद : ५२ हजार रुपये
एकनाथराव गणपतराव खडसे, मुक्ताईनगर : एक लाख रुपये
दिलीप ओंकार वाघ, पाचोरा : ५० हजार रुपये
ॲड. वसंतराव जीवनराव मोरे, पारोळा : ६० हजार रुपये
डाॅ. सतीश भास्कर पाटील, पारोळा : ७० हजार रुपये
राजाराम गणू महाजन, रावेर : ५० हजार रुपये
अरुण पुंडलिक पाटील, रावेर : ६० हजार रुपये