ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.18 : क्रिकेट अन् त्यातही भारत-पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी देशांमध्ये सामना म्हटला की किक्रेटप्रेमींमध्ये अपूर्ण उत्साह असतो़ आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी जळगावकरांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्साह होता. या लढतीमुळे रविवारी दुपारनंतर जळगाव शहरात शुकशुकाट होता.
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत व पाकिस्तान हे दोघे संघ एकमेकांसमोर उभे ठाकल़े शाळा, महाविद्यालयीन विद्याथ्र्यासह शासकीय कर्मचा:यांसाठी रविवार सुटीच्या दिवशी सामना असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला़ दुकानदार, व्यावसायिकांनी सामन्यासाठी आपली दुकाने बंद ठेवली़ तर महत्वाच्या कामानिमित्तांने बाहेर पडलेल्यांनी दुकाने, हॉटेलवर सामना पाहण्यासाठी गर्दी केली़ अंतिम लढतीमुळे शहरातील रस्ते, मार्केटमध्ये शुकशुकाट होता़
रविवारी दिवसभर हॉटस्अप तसेच फेसबुकवर या भारत पाक लढतीची चर्चा होती़ रविवारी अनेक जण संदेशाच्या माध्यमातून आपला डीपी तिरंगा तसेच इंडिया ठेवण्याचे आवाहन करीत होते. हॉटस्अपच्या काही ग्रुपच्या डीपीवर तिरंगा झळकला़ पाकिस्तान संघावर आधारीत विनोदी संदेश सोशल मिडीयावर वेगात व्हायरल झाले.