भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्त सोमवारी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बारी वाड्यात यात्रा भरली होती. प्रसंगी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.गावाच्या दक्षिण दिशेला कालिंका माता मंदिरापासून खंडेराव मंदिरापर्यंत ‘खंडेराव महाराज की जय’ घोषणा करीत संतोष पारधी या भक्ताने बारागाड्या ओढल्या. त्यांना मोहन पाटील व ज्ञानेश्वर पालोदे या बगल्यानी सहकार्य केले. बारागाड्या पाहण्यासाठी कुºहे (पानाचे) पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला. गावाची लोकसंख्या मोठी असतानाही गावामध्ये एवढ्या शांततेत कार्यक्रम पार पडला. त्यामुळे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान, यात्रोत्सवानिमित्त यात्रेत लहान मुलांची खेळणी, मिठाईची दुकाने, मोठ्या प्रमाणात आली होती. यावेळी पो.कॉ. सपकाळे, गजानन पालवे यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.
भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे बारागाड्या उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:06 PM
भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्त सोमवारी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
ठळक मुद्देपंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थितीखंडेराव महाराजांचा जयघोष