जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा पोषणावरील आंतरराष्ट्रीय ई-कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी पी पाटील यांनी केले. याप्रसंगी मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे, उच्च शिक्षण सहसंचालक जळगाव डॉ. सतीश देशपांडे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, डॉ. प्रदीप तळवलकर व डॉ.तारक दास आदी उपस्थित होते. या आॅनलाईन कार्यशाळेत भारतामधून तसेच भारताबाहेरील एकूण ७५० सदस्य सहभागी झाले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेत डॉ. शत्रुंजय कोटे, सुरजीत संधू, उमंग गंगापूरकर आदींनी मार्गदर्शन केले़ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलेश जोशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. पंकज पाटील, मोहन चौधरी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़
क्रीडा पोषणावरील आंतरराष्ट्रीय ई-कार्यशाळेचे उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 8:37 PM