शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

उत्कंठावर्धक निवडणुकीची चाचणी रंगतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 4:02 PM

यंदाची लोकसभा निवडणूक उत्कंठावर्धक होणार आहे. मोदींच्या नावाची जादू कायम आहे काय?, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची कामगिरी कशी राहील? महत्त्वाकांक्षी प्रादेशिक नेत्यांच्या महाआघाडीचे भवितव्य काय? याची उत्तरे मिळणार आहेत.

मिलिंद कुळकर्णीलोकसभा निवडणुकीला एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे की, प्रत्येक राजकीय पक्ष ताक फुंकून पित आहे. भाजपाच्या विद्यमान चार खासदारांसह कोणत्याही पक्षाच्या एकाही उमेदवाराला तिकिटाची शाश्वती आजच्या घडीला नाही. मतदारसंघातील समीकरणे, इच्छुक उमेदवाराची बलस्थाने आणि कमकुवत दुवे, प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराची कामगिरी, मतदारसंघातील राजकीय घडामोडी यावर बारकाईने लक्ष ठेवून उमेदवार निश्चित केला जाईल. ही पहिली चाचणी रंगतदार अवस्थेत आहे.खान्देशातील चार जागांपैकी भाजपा-शिवसेना युतीअंतर्गत भाजपाकडे चारही जागा आहेत. काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीअंतर्गत धुळे, नंदुरबार काँग्रेसकडे तर जळगाव, रावेर राष्टÑवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत. रावेरची जागा काँग्रेसला हवी आहे, तर नंदुरबारच्या जागेसाठी राष्टÑवादी काँग्रेस इच्छुक आहे. राज्यपातळीवर ज्या ८ जागांचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. बहुदा त्यात या दोन जागांचा समावेश असू शकतो. स्थानिक नेते प्रतिष्ठा पणाला किती लावतात त्यावर या जागा रोखणे वा खेचणे अवलंबून राहणार आहे.माझी उमेदवारी निश्चित आहे, असे कोणत्याही राजकीय पक्षाचा इच्छूक उमेदवार किंवा विद्यमान खासदार म्हणू शकत नाही, एवढ्या अटीतटीची आणि चूरसपूर्ण स्थिती लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दिसून येत आहे. २०१४ च्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक उत्कंठावर्धक होणार आहे, हे निश्चित असले तरी उमेदवारी निश्चितीची पहिली चाचणी एवढी रंगतदार होईल, अशी अपेक्षा नव्हती. पण तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि राफेलप्रकरणी सुरु झालेला वादंग पाहता प्रत्येक राजकीय पक्ष उमेदवारी निश्चितीपासूनच सावधता आणि सतर्कता बाळगत आहे.भाजपाने खूप गांभीर्याने ही निवडणूक घेतली आहे. खान्देशातील चारपैकी ए.टी.पाटील वगळता तिन्ही खासदार पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे अनुभवी आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या अशा चौघा खासदारांच्या कामगिरीचे अचूक आणि सखोल मूल्यमापन केले जात आहे. सहा महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचा कौल या खासदारांना सांगून काही सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचा काय परिणाम झाला, याची माहिती पक्षपातळीवर घेतली जात आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, मातब्बर नेत्यांच्या नातलग असलेल्या रक्षा खडसे व डॉ.हीना गावीत आणि दुसऱ्यांदा निवडून आलेल्या ए.टी.पाटील यांना अद्याप पक्षाने उमेदवारीविषयी हिरवा कंदील दिलेला नाही. यापैकी काहींनी मुंबई आणि दिल्लीत शिष्टमंडळे पाठवून प्रयत्न चालविले आहेत.नंदुरबारात डॉ.हीना गावीत यांच्या उमेदवारीविषयी वेगवेगळ्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मध्यंतरी त्या काँग्रेस पक्षात जातील, अशी चर्चा होती. आता राष्टÑवादी कॉंग्रेसकडून त्या निवडणूक लढवतील आणि त्यासाठी ही जागा कॉंग्रेसकडून मागण्याचा राष्टÑवादीचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु आहे.पुढील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन डॉ.विजयकुमार गावीत स्वगृही परतण्याचा विचार करु शकतात, त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीपासून होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे. भाजपाने चार वर्षांत डॉ.गावीत यांना मंत्री केलेले नाही, हे त्यामागे कारण म्हटले जात आहे.डॉ.सुभाष भामरे यांच्यापुढे मालेगावमधील मतदान मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अमरीशभाई पटेल असल्याने मराठा समाजाची मते भामरेंकडे वळली. परंतु, यंदा रोहिदास पाटील हे उमेदवार असण्याची शक्यता असल्याने भामरे यांच्या मतांचे विभाजन होणार आहे. पुन्हा धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांचा उपद्रव हे मोठे आव्हान राहणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाला नव्या रणनीतीनुसार डॉ.भामरे यांना मैदानात उतरवावे लागणार आहे. भामरे यांच्या तुलनेत मातब्बर दुसरा उमेदवार पक्षात नसला तरी आयात उमेदवाराचा पर्याय हाताशी आहे.ए.टी.पाटील यांना तिसºयांदा उमेदवारी मिळण्यात अडचणी दिसून येत आहेत. मुळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पाठबळ कुणाला मिळते, यावर जळगावची उमेदवारी अवलंबून आहे.चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, विधान परिषद सदस्य स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पाटील, निवृत्त अभियंता प्रकाश पाटील, बेटी बचाव अभियानाच्या प्रा.डॉ.अस्मिता पाटील असे अनेक इच्छुक भाजपाकडे आहेत. रावेरमध्ये निर्णय घेणे भाजपासाठी अवघड आहे. कारण या मतदारसंघावर खडसे यांचा असलेला प्रभाव पक्षाला विचारात घ्यावा लागेल. एकेका जागेसाठी प्रयत्न करायचे असल्याने ही जागा सहजसहजी जाऊ दिली जाणार नाही. त्यामुळे खडसे आणि पक्षश्रेष्ठींमध्ये काय चर्चा होते, त्यावर उमेदवारी अवलंबून आहे. स्वत: खडसे यांनी निवडणूक लढवावी, विधानसभेसाठी रक्षा खडसेंना उमेदवारी देऊ, अशा प्रस्तावाची चर्चा आहे. आमदार हरिभाऊ जावळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन ही नावे दावेदारांच्या यादीत आहेत.आघाडीत नंदुरबारला आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी, जळगावला राष्टÑवादीतर्फे अनिल भाईदास पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. रावेरविषयी कॉंग्रेस आग्रही असून डॉ.उल्हास पाटील हे दावेदार आहेत.खडसे, गावीतांकडे लक्षएकनाथराव खडसे काय निर्णय घेतात, यावर रावेरच्या जागेविषयी सर्वच पक्षांची रणनीती अवलंबून आहे. रक्षा खडसेंचे तिकीट निश्चित असल्याची ग्वाही भाजपाकडून मिळत असेल तर खडसे अन्य विचार करणार नाहीत, असा अंदाज आहे. तिकडे डॉ.विजयकुमार गावीत हे विधानसभा निवडणूक लक्षात घेत स्वगृही परतण्याचा विचार करु शकतात, हा एक अंदाज आहे. काँग्रेस नेते प्रथमच एकवटले आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव