फैजपूर : भावसार समस्त पंच ट्रस्ट व श्री भावसार क्षत्रिय समाज मंदिर या संस्थांचे खोटे दस्तावेज बनवून आम्हीच खरे ट्रस्टी असल्याचे सांगत नवीन कार्यकारिणी घोषित केल्या प्रकरणी मूळ अध्यक्ष योगेश भावसार यांनी यावल न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून येथील सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संस्थेचे मूळ अध्यक्ष योगेश वसंत भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भावसार समस्त पंच ट्रस्ट व श्री भावसार क्षत्रिय समाज मंदिर या दोन्ही संस्थांचे खोटे सिक्के व व प्रोसिडिंग बनवून त्याआधारे जळगाव येथील धर्मदाय आयुक्तांकडे आम्हीच खरे ट्रस्टी व अध्यक्ष असल्याचे सांगत स्वत:ची नवीन कार्यकारणी घोषित केली होती. शिवाय दोन्ही संस्थांचे बँकेचे व्यवहार करण्यासाठी डुप्लीकेट पासबुक व ठेव पावत्यांची मागणी केली व ट्रस्टच्या मालकीच्या दानपेटी मधील रोकड परस्पर काढून नेली. त्यामुळे योगेश भावसार यांनी यावल न्यायालयात धाव घेत खटला दाखल केला होता. त्यावरून यावल न्यायालयाने चौकशीचे आदेश देत सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.याप्रकरणी पोलिसात फसवणूकीचा व अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम ,फौजदार जिजाबराव पाटील करीत आहेत.प्रांत कार्यालवर नेला मोर्चादरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या भावसार समाजाच्या समाजबांधवांनी बुधवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन सादर केले.त्यात त्यांनी मूळ मालक म्हणवणारे योगेश भावसार व अन्य दोघे यांनी संस्था मालकीची मिळकत हडप केली आहे. त्यास समाजबांधवांनी विरोध केला होता, त्या गोष्टीचा राग येऊन समाजबांधवांविरुद्ध खोट्या केसेस व गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. याची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी समाजाची मिळकत परत मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यांच्या विरुद्ध झाला गुन्हा दाखलगुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अतुल किसन भावसार, प्रवीण पुंडलिक भावसार, संतोष भावसार, ललित भावसार, संतोष मोतीलाल भावसार, अमित किसन भावसार, ऋषिल गोवे, नंदकिशोर सोमवंशी, किसन दुगार्दास भावसार, सुनील गोवे, गजानन गोवे , सुरेश मगरे ,अनिल मगरे, पुंडलिक भावसार, सुभाष मगरे ,प्रज्ञेश सुनील गोवे, यांचा समावेश आहे.
खोटे दस्तावेज बनवून कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 4:58 PM
भावसार समस्त पंच ट्रस्ट व श्री भावसार क्षत्रिय समाज मंदिर या संस्थांचे खोटे दस्तावेज बनवून आम्हीच खरे ट्रस्टी असल्याचे सांगत नवीन कार्यकारिणी घोषित केल्या प्रकरणी मूळ अध्यक्ष योगेश भावसार यांनी यावल न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून येथील सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देफैजपूर पोलिसात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखलभावसार पंच ट्रस्टचा वाद चव्हाट्यावरन्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झाला गुन्हा