जि.प.ची आज सभा
जळगाव : जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेचे सोमवारी दुपारी २ वाजता ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अर्थ समिती सभापती लालचंद पाटील हे अर्थसंकल्प सादर करणार आहे. यंदा पंधरा कोटींचा हा अंदाजीत अर्थसंकल्प असून, अनेक समित्यांच्या तरतुदींना कात्री लागली आहे. त्यामुळे या सभेकडे लक्ष लागून आहे.
८६ हजारांवर लसीकरण
जळगाव : जिल्ह्यात ८६ हजारांवर कर्मचारी व निकषात बसणाऱ्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत असून, ही संख्या ८६ हजार ६७७ वर पोहोचली आहे, तर ११ हजार ६९८ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
रोटरीचे केंद्र आजपासून
जळगाव : रोटरी भवनात सोमवारपासून कोरोना लसीकरण केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे. जीएमसीतील केंद्र आता रेडक्रॉस येथे सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी नियमित सरासरी २०० जणांना लस दिली जात आहे. शहरातील मनपाच्या रुग्णालयात सर्वाधिक लसीकरण होत असल्याचे चित्र आहे.
साडेपाच लाखांवर चाचण्या
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना चाचणयांची संख्या ५,५९,९४० वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक अँटिजन चाचण्या करण्यात आल्या असून, यात शहरातील चाचण्यांची संख्या अधिक असल्याचे सिद्ध आहे. शहरात सद्यस्थिती साडेपाचशेच्या आसपासन नियमित चाचण्या होत आहेत.