जळगाव : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा वकील संघाच्यावतीने मंगळवारी रस्ता सुरक्षा सप्ताह तसेच रस्ता सुरक्षा चिन्ह व मार्गदर्शक तत्वे या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़डी़जगमलाणी यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी न्यायाधीश पी.वाय.लाडेकर, अॅड. दिलीप बोरसे, अॅड. प्रभाकर पाटील, अॅड. दर्शन देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव के.एच.ठोंबरे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमात जनजागृतीपर फलकांची प्रदर्शनी भरविण्यात आली होती. ५० जनजागृतीपर फलक लावण्यात आले होते. त्यात सामान्य नागरिकांनी वाहन चालविताना कोणती काळजी घ्यावी याबाबतचे फलकांचा समावेश होता. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शनीला भेट देणा-या व्यक्तींना माहिती पत्रक देण्यात आले.