जळगाव : गेल्या ९५ वर्षांपासून पाचोरा ते जामनेरच्या दरम्यान धावणाऱ्या पीजे रेल्वेचे लवकरच बोदवडपर्यंत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. विस्तारीकरणासंदर्भात भुसावळ रेल्वे विभागाकडून नुकताच रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.चाळीसगाव-धुळे प्रमाणे पाचोरा-जामनेर ही रेल्वेदेखील अनेक वर्षापासून धावत असून, दिवसातून दोन फेºया करत असते. प्रवाशासांठी अंत्यत सोयीची असल्याने दररोज या पॅसेंजरला मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. पाचोरा येथुन निघाल्यानंतर वरखेडी, पिंपळगाव, शेंदुर्णी,पहूरमार्गे ही गाडी जामनेरला जात असते. एकूण ५६ किलोमीटर ईतके हे अंंतर आहे. गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींकडून बोदवडपर्यंत मार्गाचा विस्तार करण्याची मागणी करण्यात येत होती. रेल्वे मंत्रालयाने विस्तारीकरणाला मंजुरी दिल्यानंतर भुसावळ रेल्वे विभागातर्फे या मार्गाचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले.या कामानंतर ग्रामीण भागातील हजारो प्रवाशांना दळणवळणाच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे.सर्वेक्षणनंतर रेल्वेमंत्रालयाकडे अहवाल सादरपाचोरा येथुन धावणारी पीजी रेल्वे बोदवडपर्यंत नेण्यासाठी रेल्वे अधिकाºयांनी नुकतेच या मार्गाचे सर्वेक्षण केले आहे. बोदवडपर्यंत एकूण ३१ किलोमीटरचा हा वाढीव मार्ग असणार आहे. सर्वेक्षणानंतर विस्तारीकरणाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. साधारणत: हा मार्ग तयार करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, बोदवडपर्यंत ही लाईन झाल्यावर हा मार्ग थेट नागपूर मागार्शी जोडला जाणार आहे. यामुळे दळणवळणाची सुविधा देखील अधिक सुलभ होणार आहे.पाचोरा ते जामनेर दरम्यान धावणाºया पीजे रेल्वेचा विस्तार बोदवडपर्यंत करण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण करुन, मंजुरीसाठी प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. पुढील वर्षाच्या रेल्वे अर्थ संकल्पात या रेल्वे लाईनच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुुरुवात होईल.-आर. के. यादव, डीआरएम, भुसावळ
पीजे रेल्वेचे बोदवडपर्यंत होणार विस्तारीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 1:04 PM