उत्तर : डेअरी उद्योगासाठी वर्षाची सुरुवात चांगली झाली. मात्र नंतर लाॅकडाऊनमुळे उद्योगांवर मोठा परिणाम झाला. कामगारही गावाकडे परतले होते. त्यामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली. आता यातून सावरण्याचे आव्हान आहे, मात्र डेअरी, खाद्य उद्योग बऱ्यापैकी पूर्वपदावर येत आहेत.
२) गेल्या अर्थसंकल्पाने अपेक्षापूर्ती केली का? आपले अनुभव काय?
उत्तर : होय. गेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठी तरतुद करण्यात आली होती. त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी चांगल्या संधी उपलब्ध झाल्यास त्याचा डेअरी उद्योगालाही लाभ होतोच. आपल्याकडेही त्याचा लाभ झाला. मात्र काहीसा लाॅकडाऊनचा परिणाम राहिला.
३) यंदाच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा काय?
उत्तर : केंद्र सरकारने स्टार्ट अप व मेक इन इंडियासाठी चांगले धोरण अवलंबले आहेत. त्याला अधिकाधिक प्राधान्य देत उद्योगवाढीसाठी कमीत कमी व्याजदरात अधिक भांडवल उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यामुळे उद्योग वाढीस मोठी चालना मिळू शकते.