शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

व्यापारी एकता दिनानिमित्त अपेक्षा : सरकारने आता ‘एक देश-एक कर’ घोषणेची अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:46 AM

स्थानिक प्रश्न मार्गी लागण्याची मागणी

जळगाव : ‘एक देश-एक कर’ अशी घोषणा करून देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला असला तरी अद्यापही जीएसटीचे वेगवेगळे दर असल्याने देशात एक कर नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पुन्हा भाजप सरकारला बहुमत मिळाल्याने सरकारने देशात जीएसटीचे एकच दर लागू करून खऱ्या अर्थाने ‘एक देश-एक कर’ घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी व्यापारी बांधवांनी व्यापारी एकता दिनानिमित्त केली आहे. या सोबत कालबाह्य झालेले कायद्यात मुक्तता करीत स्थानिक प्रश्नही सोडवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वेगवेगळ््या प्रकारचा व्यापार व वेगवेगळ््या गरजा यामुळे व्यापारी वर्ग विखुरला गेला आहे. यामुळे व्यापारविरुद्ध घेतल्या जाणाºया निर्णयास प्रत्येकास सामोरे जावे लागते. मात्र व्यापारी एकता दिनानिमित्त व्यापारी सरकारच्या धोरणाविरुद्ध कृती कार्यक्रम ठरवितात. याच दिनाचे औचित्य साधत ‘लोकमत’ने व्यापाऱ्यांच्या विविध समस्या व त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या. त्यावेळी सरकारच्या निर्णयासह स्थानिक समस्यांनी व्यापारी वेठीस धरल्या जात असल्याचा सूर उमटला.व्यावसायिक कर ‘जैसे थे’वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करताना त्यात सर्व कर सामावले जातील असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात व्यावसायिक कर, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार शुल्क व इतर कर अद्यापही कायम आहे. त्यामुळे कराच्या पूर्ततेची प्रक्रिया व्यापाºयांना तर करावीच लागत आहे, शिवाय वेगवेगळ््या करांना सामोरे जाताना त्रास कायम असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.प्रतिनिधित्व मिळावेराज्याला दोन लाख कोटींचा कर देणाºया व्यापाºयांबाबत निर्णय घेताना सरकार त्यांनाच विश्वासात घेत नसल्याने शिक्षक मतदार संघ व इतर क्षेत्राच्या मतदार संघाच्या धर्तीवर व्यापारी मतदार संघ तयार करण्यात येऊन व्यापाºयांनाही प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी व्यापाºयांनी व्यापारी एकता दिनानिमित्त केली आहे. ही सुरुवात व्यापारनगरी असलेल्या जळगावातूनच व्हावी, असेही शहरातील व्यापाºयांचे म्हणणे आहे.संकल्पपत्रातील घोषणांची पूर्तता करवीभाजपने निवडणूक संकल्पपत्रात मध्यम व छोट्या व्यापाºयांना निवृत्ती वेतन, स्वतंत्र व्यापार मंत्रालय, विमा कवच देण्याबाबत घोषणांचा समावेश करण्यात आला. आता या सर्वांची अंमलबजावणी करावी तसेच जळगावातील गाळे प्रश्न तातडीने मार्गी लावावा, जळगाव ते पुणे विमान सेवा तातडीने सुरू करावी अशा विविध मागण्या व्यापारी एकता दिनानिमित्त व्यापारी प्रतिनिधींनी केली आहे.विविध संघटनांकडून विरोधसरकार हे निर्णय एक प्रकारे व्यापाºयांवर लादत असल्याने त्यास व्यापाºयांचा विरोध आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील जिल्हा व्यापारी मंडळ व त्यातील विविध संघटना यांच्यावतीने राज्य पातळीवरील महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स, फॅम, देशपातळीवरील कॉन्फडरेशन आॅफ इंडिया ट्रेडर्स (कैट) या संघटनांमार्फत मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.जळगावातून झाली व्यापारी एकता दिनाची ओळखविखुरलेल्या व्यापाºयांना एकत्र आणत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी साधारण ४०-४१ वर्षांपूर्वी व्यापारी एकता दिनाला सुरुवात झाली. मात्र २० वर्षांपूर्वी भारतीय व्यापारी संघाचे तत्कालीन अध्यक्ष तथा लखनौचे तत्कालीन खासदार श्यामबिहारी मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे व्यापाºयांचे भव्य संमेलन झाले व हे संमेलन देशभरात पोहचले. तेव्हापासून या दिनाची खरी ओळख व्यापाºयांना झाल्याचे सांगण्यात आले.जीएसटी लागू झाला तरी कालबाह्य झालेला व्यावसायिक कर अद्यापही कायम आहे. तो रद्द करावा.- ललित बरडिया, सचिव, सहसचिव जिल्हा व्यापारी महामंडळ.सरकारने संकल्पत्रात नमूद केलेले निवृत्ती वेतन, व्यापाºयांना विमा, व्यापाºयांसाठी स्वतंत्र मंत्रालय या घोषणांची अंमलबजावणी व्हावी.- पुरुषोत्तम टावरी, सहसचिव जिल्हा व्यापारी महामंडळ.व्यापार विषयक कोणताही निर्णय घेताना व्यापाºयांना विश्वासात घेतले जावे. यासाठी व्यापारी प्रतिनिधीस स्थान द्यावे.- युसुफ मकरा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ.जीएसटी लागू झाला तरी स्थानिक कर ‘जैसे थे’ असल्याने व्यापारी वेठीस धरले जात आहे. त्यामुळे हे कर रद्द करावे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.जीएसटीमध्ये अनेक बदल करण्यात आले. तरीही त्यात काही किचकट अटी आहे. त्या दूर करण्यात येवून जीएसटीचा एकच दर ठेवावा.- दिलीप गांधी, माजी अध्यक्ष, हार्डवेअर असोसिएशन तथा संचालक, जिल्हा व्यापारी महामंडळ.

टॅग्स :Jalgaonजळगाव