भुसावळ,दि.8 - अस्वच्छतेत देशभरात दुसरे शहर म्हणून गणल्या गेलेल्या भुसावळात स्वच्छतेवरून सत्ताधारी व विरेाधी जनआधार विकासपार्टीत चांगलेच कलगीतुरे रंगत आहेत़ अपयशाचे खापर एकमेकांवर फोडले जात असतानाच सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधा:यांनी पडावू इमारतीत सभापती दालन दुरुस्तीसाठी केलेल्या लाखो रुपयांच्या तरतूदीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या संतापात आणखीन भर पडली आह़े विरोधी जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी या प्रकाराला लेखी हरकत नोंदवली आह़े
सोमवारी पालिका सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली़ नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, प्रा.दिनेश राठी, दीपाली ब:हाटे, पुष्पलता बत्रा, शैलजा नारखेडे, जनआधारचे नगसेवक दुर्गेश ठाकूर, मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांची उपस्थिती होती़ स्थायीच्या बैठकीत 43 विषयांना मंजुरी देण्यात आली.