शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ढगाळ, पावसाळी वातावरणाने महाबळेश्वरची अनुभुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:31 AM

जळगाव : भर हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह खरीपातील कापसासह रब्बी पिकांनाही ...

जळगाव : भर हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण होऊन झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह खरीपातील कापसासह रब्बी पिकांनाही मोठा फटका बसला आहे. शनिवारी सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरण व दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जळगावात महाबळेश्वरची अनुभुती शहरवासीयांनी घेतली. अशा वातावरणात गारपिटचे संकट ओढावले तर रब्बी ज्वारीलादेखील मोठा फटका बसण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणाने हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, १६ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळपासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान पावसाचा शिरकाव झाला. मात्र दुपारी तीन वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजता तर पावसाने जोर धरला व जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला.

अंगात स्वेटर, वर रेनकोट

ऐन थंडीच्या डिसेंबर महिन्यात असलेल्या ढगा‌ळ वातावरणामुळे थंडी काहीसी कमी झाली. मात्र शनिवारी झालेल्या पावसामुळे गारठा निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी थंडीपासून बचावासाठी स्वेटर व इतर उबदार कपडे घातले. मात्र त्यानंतर पावसामुळे त्यावर रेनकोटदेखील घालण्याची वेळ शहरवासीयांवर आली. या सर्व प्रकारामुळे अंगात स्वेटर व त्या वर रेनकोट असे चित्र शहरात पहावयास मिळाले व महाबळेश्वरची अनुभुती शहरवासीयांनी घेतली.

शहरवासीयांची तारांबळ

दुपारी अचानक पाऊस सुरू झाल्याने शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात खरेदीसाठी आलेल्यांनी पावसापासून बचावासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेतला. बाजारपेठेत बाहेर ठेवलेले साहित्य काही प्रमाणात ओले झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दुचाकीस्वारांनी तर घराकडे धाव घेतली. यात अनेक जण ओले झाले.

अजून तीन दिवस राहणार असेच वातावरण

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यासह इतरही भागातही ढगाळ वातावरण राहण्यासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्यानुसार अजून तीन दिवस म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पिकांना फटका

अगोदरच पावसाळ्यात झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर मात्र अतिपावसाचा रब्बी पिकांना लाभ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्या रब्बी पिकांना ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. यात कांदा बियाणे नष्ट होत असून हरभरा पिकावर ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या गव्हाचे पिक लहान असले तरी शनिवारी झालेल्या पावसाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. मात्र जोरदार पाऊस झाल्यास हे पिकदेखील नष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रब्बी ज्वारीला लाभ, माऊ गारपिट झाल्यास संकट

सध्या होत असलेल्या पावसाचा रब्बी ज्वारीला लाभ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र गारपिट झाल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. गारपिटीच्या भीतीने अगोदरच चिंतेत असलेल्या बळीराजाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

कापूस गेला वाया

अवकाळी पावसामुळे शेतात जो काही कापूस शिल्लक आहे, तो ओला होऊन पूर्णपणे वाया गेला आहे. अगोदरच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादकांना फटका बसला. आता शेतात जो काही कापूस शिल्लक असेल, तो काढू या विचारात असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे.

शहरात पुन्हा चिखल

भर पावसाळ्यात शहरवासीयांना चिखलातून मार्ग काढत जाण्याची वेळ आली होती. आता तर शहरातील चिखलाच्या प्रमाणात आणखी भर पडली आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे बी.जे. मार्केट परिसर, बालगंधर्व खुले नाट्यगृह, जि.प. परिसर, गिरणा टाकी परिसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयसमोरील परिसर, नवी पेठे या भागात काहीसी पाणी साचले होते. या सोबतच शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले असल्याने शहरभर चिखल झाल्याचे चित्र आहे. या ठिकाणाहून वाहनधारकांना वाहने काढताना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक जणांच्या दुचाकी तर घसरत होत्या.