बायोकेमिकल आणि टरपेंट ऑईल मिश्रित करून त्याचे बायोडिझेल बनवून त्यात डिझेलचा रंग येण्यासाठी अन्य एका केमिकल्सचा वापर करून हे डिझेल बाजार भावापेक्षा पंचवीस ते तीस रुपये प्रति लीटर कमी भावाने या ढाब्यावर सर्रास विक्री केली जात असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांची येथे गर्दी होऊ लागली. दोन दिवसांपूर्वी ट्रकमध्ये हे डिझेल भरत असताना अचानक नोझलने पेट घेतला. उडालेल्या भडक्यात कामगार जखमी झाला. तातडीने खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांत या घटनेची नोंद झाली नव्हती. ट्रकने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ होऊन जीवितहानीदेखील झाली असती. सुदैवाने घटना टळली. मात्र प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून याबाबत कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातून होत आहे.