शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

दूध उत्पादकांना ५ रूपये अनुदानाला मुदतवाढ - पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:53 PM

जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आढावा बैठक

जळगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांना लीटरमागे ५ रूपये अनुदान देण्याची मुदत आॅक्टोबर अखेर संपत होती. मात्र दुष्काळी परिस्थिती असल्याने आमदार सुरेश भोळे यांनी ही मुदत वाढविण्याची मागणी केल्याने ही मुदत आणखी तीन महिने वाढवित असल्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ आढावा बैठकीत केली.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतावर जाऊन पाहणी करण्यासाठी आलेल्या पशुसंवर्धन मंत्री जानकर यांना आमदार भोळे यांनी आढावा बैठकीतच निवेदन दिले. त्यात शासनाकडून सहकारी संघ व खाजगी संघांना लिक्वीड मिल्क सेल वगळून ज्या अतिरिक्त गाईच्या दुधाचे दूध भुकटीत रूपांतर केले जाते, अशा दूधाला ५ रूपये प्रतिलिटर अनुदान दिले जाते. मात्र संघाने उत्पादकाला त्यांनी खरेदी केलेल्या संपूर्ण दुधावर रूपये २५ प्रतिलिटर भाव देणे बंधनकारक आहे. ही योजना आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत कार्यरत होती.जळगाव जिल्हा दूध संघाकडे ८०० पेक्षा अधिक प्राथमिक दूध उत्पादक संस्था, बचतगट यांच्याकडून प्रति दिन २ लाख लीटर गाईच्या दुधाचे संकलन होते. त्यापैकी १.२० लाख लिटर्स दुधाची तरल विक्री होते. तर ८० हजार लिटर्स दुधासाठी पावडर केली जाते.दूध संघाने १०० टक्के दुधाचे पेमेंट बँकेद्वारा दूध उत्पादकांना अदा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संघाने प्राथमिक दूध उत्पादक संस्थांना बँकेद्वारे पेमेंट केले असल्याने शासनाने पूर्ण अनुदान संघास अदा करावे, अशी मागणी केली. तसेच योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली. ती मागणी जानकर यांनी मान्य करीत योजनेस आणखी तीन महिने मुदतवाढ दिली.पाईपलाईनसाठी विचार व्हावागिरणा धरणात ४६ टक्के पाणीसाठा आहे. कॅनॉलमधून पाणी सोडता येणार नाही. असे पाणी सोडणे धोकादायक आहे. नदीपात्रातून पाणीसोडावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. वाळूचे खड्डे भरत वेळ जातो. त्यामुळे पाईपलाईनने पाणीपुरवठा करावा.अन्य जिल्ह्यांच्या मदतीसाठीही सज्जताजिल्हाधिकारी निंबाळकर यांनी जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना ओझरखेडा येथे मानवनिर्मित तलावात हतनूरमधून पाणीसाठा करण्यात आला असून जर लगतच्या जिल्ह्यांना गरज भासली तर सांगलीहून ज्याप्रमाणे लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा झाला, त्यानुसार या ठिकाणाहून पाणी नेता येईल, असे सांगितले.

टॅग्स :milkदूधJalgaonजळगाव