शेतकऱ्यांच्या मालाला इतर बाजारपेठांमध्ये चांगला भाव मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गेल्यावर्षी देवळाली ते मुजफ्फरपूर दरम्यान किसान पार्सल रेल्वे गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे शेतकरी बांधवांना आपला कृषी माल राज्यातील इतर बाजारात विक्री करणे शक्य झाले आहे. या गाडीला जळगावलाही थांबा देण्यात आला असून, शेतकऱ्यांसह व्यापारी व उद्योजकांनाही माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे; मात्र शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांनाच या गाडीचा सर्वाधिक फायदा होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, शेतकरी बांधवांनाही या गाडीचा फायदा होत असल्याचे सांगितले. रेल्वेतर्फे यंदा ३१ मार्चपर्यंत या गाडीची मुदत वाढविण्यात आली आहे.ज्या शेतकऱ्यांना आपला माल इतर राज्यात पाठवायचा असेल, त्यांनी जळगाव स्टेशन येथील पार्सल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
इन्फो ;
शालीमारकडे जाणाऱ्या गाडीच्या मुदतीत वाढ :
रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांप्रमाणे उद्योजक व इतर नागरिकांच्या सामानाची ने-आण करण्यासाठी सुरु केलेल्या मुंबई-शालीमार पार्सल गाडीच्या मुदतीतही वाढ केली असून,यंदा ३१ मार्चपर्यंत ही गाडी धावणार आहे. या पार्सल गाडीलाही जळगाव स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.