एरंडोल : तालुक्यातील पिण्याचे पाणी व शेती सिंचनासाठी लाईफ लाईन असलेल्या गिरणा धरणात आजमितीलाही फक्त आठ टक्के साठा आहे.तर एरंडोलच्या अंजनी धरणात अजुनही मृत साठा आहे. त्यामुळे एरंडोल तालुक्यातील जनतेचे या दोन्ही प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा कधी होणार ? याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.अंजनी धरणात २८ जुलै रोजी .८० द.ल.घ.मी.एवढा मृत जलसाठा आहे. ३.७७ द.ल.घ.मी. एकुण मृत साठ्यापैकी सध्या अंजनी धरणात फक्त २० टक्के मृतसाठा आहे. निम्मा पावसाळा उलटूनही अंजनी धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्यामुळे चिंतेची बाब ठरली आहे.गेल्या वर्षीच्या दुष्कामधून लोक अजून सावरले नसताना यंदाही पुरेसा पाऊस न झाल्यामुळे नागरिकांना भविष्याची चिंता लागली आहे.
धरणांच्या स्थितीबाबत कमालीची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 2:56 PM