सातगाव डोंगरी, ता.पाचोरा, जि.जळगाव : सातगाव डोंगरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने, बामणी नदीचा प्रवाह शेतात वळल्याने, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तोंडी घास आलेल्या उभ्या कपाशीचे पीक वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खान्देशातील पांढरे सोने समजल्या जाणाºया शेतकºयांचे कपाशीचे उभे पीकच मूळासह वाहून गेल्याने, शेतकºयावर पुन्हा आर्थिक संकट कोसळण्याचे चित्र निर्माण झाले आहे.परतीच्या पावसाने संकट निर्माण झाल्याने, शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटून झाले तरीही प्रशासनाने पंचनामे करण्याची दखल घेतलेली नाही. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे आणि नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी आर्त हाक बळीराजाने प्रशासनाला केली आहे.
अति वृष्टीने कपाशीचे पीक गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 5:08 PM
सातगाव डोंगरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने, बामणी नदीचा प्रवाह शेतात वळल्याने, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तोंडी घास आलेल्या उभ्या कपाशीचे पीक वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
ठळक मुद्देसातगाव डोंगरीसह परिसरातील चित्रतातडीने पंचनामे करण्याची मागणी