जळगाव : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला जात असला तरी त्या खर्चा$बाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र अद्याप सादर होणे बाकी आहे. त्यामुळे तो गैरव्यवहार म्हणता येणार नाही, असा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे. फडणवीस सरकारच्या काळातच खडसे यांच्यावर वेगवेगळे आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. आता मात्र फडणवीस यांच्याबाबत खुद्द खडसे यांनी सकारात्मक व्यक्त केले आहे.रविवारी मुक्ताईनगर येथे त्यांच्या निवासस्थानी एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी खडसेंनी उद्धव ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी, पक्षांतराची चर्चा या विषयांवरही भूमिका मांडली.देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरून सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत खडसे म्हणाले की, कॅगचे परीक्षण ही दरवर्षी निरंतर होणारी प्रक्रिया आहे. हा विषय काही फक्त फडणवीस सरकारपुरता मर्यादीत नाही. काँग्रेसच्या काळातही असे प्राथमिक अहवाल आले आहेत. सरकारने केलेल्या खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावी लागतात. जर फडणवीस सरकारने ६५ हजार कोटी रुपयांच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केली तर त्यात गैरव्यवहार झाल्याचे म्हणता येणार नाही. मात्र, आजमितीला त्यांनी ही प्रमाणपत्रे सादर केलेली नसल्याने लेखापरीक्षकांनी ठपका ठेवला आहे.शेतकऱ्यांना दिलासा-महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत ते म्हणाले की, या कर्जमाफीचे निकष अद्याप स्पष्ट नसले तरी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे. या बाबत काय निकष असतील, हे माहिती नसल्याने कर्जमाफीच्या मुद्यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही, असे खडसे म्हणाले.पक्षांतराबाबत घुमजावआपल्याला त्रास देणाºयांवर कारवाई झाली नाही तर आपण लवकरच पक्षांतर करू, अशी भूमिका खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली होती. मात्र, रविवारी त्यांनी पक्षांतराच्या विषयावर घुमजाव केले. माझ्या पक्षांतर करण्याच्या बातम्या चुकीच्या असून आपला तसा निर्णय झाला नसल्याचे सांगत त्यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले.
उपयोगिता प्रमाणपत्र नसल्याने फडणवीस सरकारवर गैरव्यवहाराचा ठपका - एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:54 PM