शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

फडणवीस खडसेंच्या कोथळीत, तर खडसे मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 9:45 PM

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुक्ताईनगर (जि. जळगाव)  : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला गतिरोधक ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन येथे खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. तिकडे खडसे मात्र सोमवारी मुंबई येथे पोहोचले आहेत. जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता फडणवीस दौऱ्यावर आले असता  मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत पोहोचले. त्यांच्यासोबत गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती आदी उपस्थित होते. सुमारे २० मिनिटे फडणवीस हे मुक्ताई सदनात थांबले होते. फडणवीस व खडसी यांच्यात ते एकाच पक्षात असतानाही पटले नाही. तर  खडसे  यांनी त्यांच्यामुळेच भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, असे सांगितले गेले आहे. अशात फडणवीस हे खडसे यांच्या निवासस्थानी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, खासदार रक्षा खडसे या भाजपच्या असून त्यांनी चहापानाचे निमंत्रण दिले. त्यामुळे आपण तेथे गेलो होतो. यात इतर कुठलेही कारण नव्हते. असे फडणवीस यांनी रावेर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. पॉईंटर..मुक्ताईनगर येथे शिवसैनिकांनी फडणवीस यांचा ताफा अडवत केळी पीक विम्याबाबत केंद्राच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करीत पूर्वीची योजनाच अंमलात आणावी, अशी मागणी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या अशी मागणी फडणवीस यांनी मुक्ताईनगर तालुक्यात केली तर मुख्यमंत्री  यांनी गतकाळी सत्तेत नसताना केलेल्या मागणीप्रमाणे शेतकर्‍यांना भरीव मदत करावी असा प्रतिहल्लाही त्यांनी रावेर येथे पत्रपरिषदेत चढवला.

फडणवीस यांच्या दौऱ्याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक पदाधिकारी अनुपस्थित होते. मुक्ताईनगर नगर पंचायतीचे आठपैकी केवळ नगराध्यक्ष नजमा तडवी आणि ललित महाजनवगळता एकही नगरसेवक उपस्थित नव्हता.

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरशेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्नमुक्ताईनगर येथील पाहणी दौऱ्यात एका तरुण शेतकऱ्याने ताफ्यातील वाहने अडवत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे येथे मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. योगेश पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची फडणवीस यांनी मंगळवारी पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार घडला. मंगळवारी दुपारी फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा या शेतकऱ्याच्या शेताकडून जात होता. त्याचवेळी योगेश याने ताफा अडवून फडणवीस यांना आपल्या शेतात येऊन पाहणी करावी, अशी विनंती केली. मात्र, त्यांनी टाळल्याने आपला दौरा फोटो सेशनसाठी असल्याचा आरोप त्याने केला. यावेळी योगेश याने सोबत विषाचा डबा आणला होता. तो पोलिसांनी जप्त केला. यानंतर फडणवीस यांच्या वाहनाचा ताफा पुढे मार्गस्थ झाला.