अमळनेर : परवाना नूतनीकरणाअभावी मुद्रांक विक्रेत्यांचे दप्तर (रजिस्टर) जमा केल्याने तालुक्यात मुद्रांक मिळत नाहीत, त्यामुळे शेतक:यांचे कर्जासाठी हाल होत आहे.दरवर्षी मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने 31 मार्चनंतर नूतनीकरण केले जातात. प्रतिज्ञापत्रावर हे परवाने नूतनीकरण केले जात असत. मात्र या वर्षापासून पोलिसांचा चारित्र्य पडताळणी अहवाल आणि मुद्रांक विक्रेत्यावर बनावट मुद्रांक विकण्याबाबत कारवाई झालेली नाही. असा अहवाल मिळाल्याशिवाय परवाने नूतनीकरण झालेले नाहीत. पोलिसांचा अहवाल प्राप्त न झाल्याने 1 एप्रिलपासून मुद्रांक विक्रेत्यांचे दप्तर (रजिस्टर) दुय्यम निबंधकांनी जप्त करून घेतल्याने गेल्या 20 दिवसांपासून मुद्रांक विक्री बंद आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.शेतक:यांना पीक कर्जासाठी, विविध कार्यकारी सोसायटी कर्जासाठी तसेच ठिबक सिंचन कर्जासाठी मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते, त्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतक:यांना मशागतीच्या कामांना सुरुवात करता आलेली नाही. मुद्रांक केव्हा मिळणार याची ठोस माहिती मिळत नसल्याने शेतकरी दररोज ग्रामीण भागातून शहरात भाडे खचरून येत आहेत. तसेच शौचालयाच्या अनुदानासाठीही गरिबांना प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते. त्याशिवाय टप्प्याने अनुदान मिळत नाही. म्हणून शौचालय बांधकामेही रखडली आहेत. परिणामी स्वच्छ महाराष्ट्र अभियानातही अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच गौणखनिजप्रकरणी कारवाई झालेली वाहनेदेखील प्रतिज्ञापत्राशिवाय सोडली जात नाहीत. तीही अडकली आहेत. मुद्रांकाअभावी जनतेचे करारनामे एप्रिल, मेअखेर होणारे भाडेपट्टे करार असे अनेक व्यवहार अडकल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत दुय्यम निबंधक कुमार मावळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. येथील मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नुतनीकरणासाठी जिल्हाधिका:यांकडे पाठविले आहेत. मात्र परवान्यांचे नुतनीकरण न झाल्याने, नागरिकांना स्टॅँपपेपर व तिकीटाचा पुरवठा करता येत नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने त्वरीत नुतनीकरण करून मिळावे अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे. तसेच नागरिकांचे होणारे हाल थांबविण्याची मागणी आहे.मुद्रांक विक्रेत्यांचे चारित्र्य पडताळणी अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मुद्रांक अधिकारी मावळे यांच्या हस्ते प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आले आहेत. ते प्राप्त झाल्यानंतर त्वरित देण्यात येतील.- विकास वाघ, पोलीस निरीक्षक, अमळनेर
मुद्रांकाअभावी शेतक:यांना कर्ज मिळेना
By admin | Published: April 21, 2017 12:35 AM