वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : अवघ्या पंचवीस कि.मी.वर असलेल्या भुसावळमध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना सेफ झोन असलेल्या फैजपूर शहरात कोरोनाने दोन पॉझिटिव्ह महिला रुग्णांच्या माध्यमातून डोळ्यात तेल घालून कार्य करणाºया प्रशासनालासुद्धा चकवा देत शहरात शिरकाव केला आहे.शहरातील सिंधी कॉलनीमधील मायलेकी अशा दोघी पॉझिटिव्ह आढल्याने पालिका, महसूल व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेत प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सपोनि प्रकाश वानखडे यांनी सिंधी कॉलनीचा परिसर सिल केला आहे.अतिशय लहान गल्ली-बोळ्यात असलेल्या या परिसराला पूर्ण बॅरिकेट करण्यात आले आहेत.रुग्णांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीबाबत माहिती घेतली असता सिंधी कॉलनीतील हा परिवार गेल्या दीड महिन्यापासूनच अहमदाबाद येथे अडकून पडला होता. हा परिवार ५ मे रोजी शहरात दाखल झाला. शहरात दाखल झाल्यावर या परिवाराने प्रशासनाला माहिती देऊन स्वत:ला क्वॉरंनटाईन करून घेणे गरजेचे होते. मात्र तसे न करता हा परिवार ८ मे रोजी क्वॉरंनटाईन झाला. त्यामुळे त्या चार दिवसांच्या काळात सदर रुग्ण महिला व तिची मुलगी कोणाच्या संपर्कात आले याचीही माहिती गोळा करणे प्रशासनाला क्रमप्राप्त होणार आहे.शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह मायलेकी तसेच त्या महिलेचा निगेटिव्ह आढलेला पती यांना जळगाव येथे रात्री उपचारासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली. या महिलेवर उपचार करणाºया डॉक्टरांसह अन्य नऊ संशयितांना जे.टी. महाजन होस्टेलमधील कोरोना केअर सेंटरमध्ये क्वॉरंनटाईन केले आहे तर बाहेरगावाहून आलेल्या अन्य २०-२५ जणांना म्युनिसीपल हायस्कूलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.एका मृत तरुणाचे घेतले नमुनेशहरातील एका तरुणाचे गुरुवारी रात्री निधन झाले. हा तरुण गेल्या चार दिवसांपासून तापाने आजारी होता. या तरुणाचे संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आले. तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे तर मृताच्या आई-वडिलांनाही कोरोना केअर सेंटरला दाखल केल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून सेफ झोनमध्ये असलेल्या फैजपूर शहरातील कोरोनाचा शिरकाव हा दुर्दैवी आहे. शहरातील नागरिकांनी स्वत:चीच काळजी घेऊन बाहेर न फिरणे व बँक, भाजीबाजार व अन्य ठिकाणी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करणे ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. तसे न केल्यास शहरवासीयांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
फैजपुरात डोळ्यात तेल घालून कार्य करणाऱ्या प्रशासनालाही कोरोनाचा चकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 2:26 PM
सेफ झोन असलेल्या फैजपूर शहरात कोरोनाने दोन पॉझिटिव्ह महिला रुग्णांच्या माध्यमातून डोळ्यात तेल घालून कार्य करणाºया प्रशासनालासुद्धा चकवा देत शहरात शिरकाव केला आहे.
ठळक मुद्देसेफ झोन असलेल्या फैजपूरमध्येही पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाचा शिरकावअनावश्यक बाहेर न फिरण्याचे प्रशासनाचे आवाहन